यवत : वाटचालीचा मोठा टप्पा... उन्हामुळे वारकऱ्यांची दमछाक होत होती. परिणामी वैष्णवांची पावले संथ पडल्याने दिंड्यामध्ये अंतर पडत होते. पण विठूरायाच्या भेटीची ओढ व मन सुखावणारी वाऱ्याची झुळूक यांच्या सोबतीने सोहळा यवतला रात्री मुक्कामी विसावला.
कीर्तन असल्याने सोहळ्याला गुरुवारी पहाटे लवकर जाग आली. संत तुकोबांरायांच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला. योगिनी एकादशीची तिथी बुधवारी होती. तर गुरुवारी द्वादशी(बारस) होती. द्वादशीला सकाळी सहा ते आठ वाजण्याच्या दरम्यान देहूकर मालकांची कीर्तन सेवा तळावर पालखी समोर झाली. त्यानंतर, यावेळी कीर्तनानंतर खिरापत वाटण्यात आली. एकादशीचा उपवास सोडत सोहळा यवतकडे मार्गस्थ झाला.
आजच्या सुरवातीला महामार्गासोबत लोहमार्ग होता. त्यानंतर, शेत-शिवाराच्या सोबतीने वाटचाल सुरु झाली. आज लोणी-काळभोर ते यवत असा २७ किलोमीटरचा टप्पा आहे. हा टप्पा पार करण्यासाठी सकाळच्या आल्हाददायक वातावरणात वारकऱ्यांची पावले झपझप पडत होती. सोहळा चालू लागला.
उन्हाची तीव्रता नऊ वाजल्यानंतर हळूहळू वाढत होती. तहान लागल्याने वारकरी पाणी पिऊन पुन्हा नामस्मरणात दंग होत होते. सकाळचा विसावा घेऊन सोहळा उरुळी-कांचन येथे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विसाव्याला थांबला.
देहूपासून आकुर्डी, पुणे येथील मुक्काम शहरी भागातील होते. हडपसर ते लोणी काळभोर हा टप्पा शेतशिवारातील होता. सोन्यासारख्या काळ्याभोर असणाऱ्या शेतजमिनीवर आता इमारती उभ्या होत्या. द्राक्ष, डाळिंब, पालेभाज्यांची नर्सरीची शेती कमी झाल्याचे नेहमीचे वारकरी सांगत होते. पण आजच्या वाटचालीत शेत- शिवार दिसत होते. थोड्या इमारती वाढलेल्या आहेत. हे वारकऱ्यांच्या सेवा करणाऱ्यांची संख्या वाढलेली यामुळे दिसत होते.
तुकोबारायांचा पालखी सोहळा रात्री नऊनंतर यवतला पोचला. विणेकरी, टाळकरी, आणि मान्यवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत समाज आरती झाली. त्यानंतर सोहळा मुक्कामी विसावला.
विठुरायाच्या भेटीची ओढ
वाटचालीत उन्हाची तीव्रता आणि मधेच वाऱ्याची झुळूक मन सुखावणारा होती. सूर्य मावळतीला गेल्याने उकाडा कमी होत गेला. पण वारकऱ्यांची
पावले थकलेली होती. तरीही विठुरायाच्या भेटीची ओढ असल्याने दुखणारी पावले देखील न थांबता विसाव्याला पोचली.
सोहळ्यात आज
यवत ते वरवंड कमी अंतराचा टप्पा
यवत, भांडगाव येथे पिठलं भाकरीचा बेत
कालव्यात वारकऱ्यांची मनसोक्त अंघोळी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.