पुणे : देहू, आळंदी ते पंढरपूर असा वारीचा पंचवीस ते तीस दिवसाचा प्रवास असतो. या प्रवासात वारकऱ्यांना आवश्यक असलेल्या जीवनावश्यक गोष्टी म्हणजे, कपड्यांची इस्री, चर्मकार, दाढी कटींग करण्यासाठी नाभिक, चहा, पान, सुपारी आदी गोष्टी गरजेच्या असतात. वारकऱ्यांना वरिल वस्तू मिळाव्यात आणि स्वताची वारी देखील होईल, या उद्देशाने इस्री , चहा, चर्मकार, नाभिक, पानटपरी व्यावसायिक वारीसोबतच आपला फिरता व्यवसाय सोबत घेऊन देहू , आळंदी ते पंढरपूर अशी वारी करतात.
"मला कळत नव्हतं तेव्हापासून आंदाजे १९७२ पासून वारीला येतो आहे. दाढी, कटिंग करायचं काम करतो. वारीला आलं की, सकाळी लवकर उठावे.वारीला आल्याने ही चांगली सवय लागते. वारी करून गेल्यावर गावकडे करमत नाही. एका महिन्याची वारी सहा महिन्याची व्हावी असे वाटते.
- सुंदर शेळके, नाभिक जालना
"गावाकडे कपडे शिवण्याचे काम करतो, वारीमध्ये इस्री करतो. वीस वर्षापासून वारीला येतो. गावातील अंबादास महाराजांची दिंडी असते. इस्री करण्यासाठी घरूनच कोळसा घेऊन येतो , तो पंढरपूरला जाईपर्यंत पुरतो. दररोज पन्नास ते साठ वारकरी इस्री करतात. सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत इस्री करतो.
- नारायण श्रीमंत, इस्री व्यावसायिक, परभणी
"छत्री, चप्पल, बूट, बॅंग शिलाई करणे, चैन बसवण्याचे कामं करतो. पाच वर्षापासून वारीला येत असून इथं आल्यावर आनंद वाटतो. गावाकडे देखील हाचा व्यावसाय करतो.वारीत एक महिना कसा जातो हेच कळत नाही. वारकऱ्यांचे चांगले मार्गदर्शन लाभते.वारी करून गावाकडे गेल्यावर पंधरा दिवस करमत नाही.
- रामकिशन बोराडे, चर्मकार
"गावाकडे देखील माझा चहाचा व्यावसाय आहे.१९९९ पासून वारीला येतोय. पुर्वी पायी चालत येत होतो. आता पत्नीला सोबत घेऊन चहाचा व्यावसाय करतो आहे. आमच्या गावातील दिंडी सोबतच आम्ही व्यावसाय करतो. वारी कायम सुरू राहवी, पाऊस चांगला पडायला हवा. शेतकरी सुखी जगावा.
- सोपान वाघमोडे, चहा, व्यावसायिक बीड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.