Ashadi Wari 2023 : एक हजार किलो पिठलं, साठ हजार भाकरी!

यवत ग्रामस्थांनी जपली वारीतील परंपरा; वारकरी होतात तृप्त
भाकरी
भाकरीsakal
Updated on

यवत : वारकऱ्यांसाठी पिठलं-भाकरी बनवण्यची परंपरा यवत (ता. दौंड) येथील ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून जपली आहे. सुमारे एक हजार किलो पिठले आणि साठ हजार भाकरी व वीस हजार चपाती दर वर्षी बनवल्या जातात. यातील साडेतीनशे किलो बाजरीच्या पिठाच्या भाकरी मंदिराच्या भटारखान्यात महिलांकरवी बनवल्या जातात. घरोघरी बनवून मंदिरात जमा होणाऱ्या भाकरींची संख्या मोठी असते.

यवत येथे पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो. हा ग्रामिण भागातील तसा पहिलाच मुक्काम आहे. या दिवशी वारीतील सुमारे एक लाख वारकऱ्यांना पुरेल इतके जेवण, तेही ग्रामिण ढंगाचे बनवण्याची यवतकरांची परंपरा आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी पिठलं-भाकरीची निवड केली आहे. येथील पिठलं अत्यंत चविष्ट असल्याने वारकरीही ते आवडीने खातात. त्यामुळे अनेक वर्षांपासून पिठलं-भाकरीची परंपरा येथे सुरू राहिली आहे. यवतकरांनी ती जपली आहे.

भाकरी
Sambhaji Nagar : बजाजनगर परिसरात कुंटणखान्यावर छापा

दरम्यान, गुरुवारी (ता. १५) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास खासदार सुप्रिया सुळे यांनी या ठिकाणी भेट दिली. मंदिराच्या भटारखान्यात सुरू असलेल्या स्वयंपाकात त्यांनी भाकरी भाजण्याचा आनंदही घेतला. या वेळी माजी आमदार रमेश थोरात,

माजी सभापती अप्पासाहेब पवार, माजी उपसभापती नितीन दोरगे, गणेश थोरात, महिला राष्ट्रवादी कॉंग्रेच्या वंदना मोहिते, माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड, सदानंद दोरगे आदी उपस्थित होते.

भाकरी
Crime news : ' घराभोवती नेहमी चकरा मारायचा अन्..' तरूणाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अशी असते तयारी...

मंदिराच्या भटारखान्यात गावातीलच कार्यकर्ते पिठलं बनवण्याच्या लगबगीत असतात. एका कढईत वीस किलो बेसन पीठ व चाळीस किलो इतर साहित्य, असे मिळून साठ किलो पिठले बनते. अशा सुमारे चौदा ते पंधरा कढयांमध्ये हे पिठले बनवले जाते. त्यासाठी गावातील तरुण मंडळी मेहनत घेतात; तर बुजूर्ग मार्गदर्शन करतात. सायंकाळी अनेक कार्यकर्त्यांच्या मदतीने जेवण वाढण्याचे काम केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.