कॅन्टोन्मेंट : महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. आषाढी व वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप्यातून देहु, आळंदी, पंढरपूर येथे दाखल होत असतात.
या वारकयांमध्धये सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते. महिनाभर या महिला वारीमध्ये चालत असताना अनेक महिलांना यामहिन्यातून एकदा तरी मासिक पाळीला सामोरे जावे लागते. विटाळ म्हणून दुर्लक्षित केलेली मासिक पाळी ही स्त्रीत्वाचा तो जन्म असतो.
सृजनशीलतेची ती जाणीव असते. मात्र याविषयावर कोणी बोलायचे नाही अशी समाज मनाची भावना असते. स्वतः वारीत सहभागी होऊन महिलांच्या अडचणी जवळून पाहिल्या आणि आयोगाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्याची संधी मिळाली असल्याचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग व पुणे मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारी कालावधीमध्ये वारकरी महिलांना सुरक्षा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणारा आरोग्य वारी अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी चाकणकर बोलत होत्या.
भवानी पेठेतील निवडून घ्या विठोबा मंदिर परिसरात हे अभियान राबवण्यात आले. या उपक्रमात सँनिटरी नॅपकिन वैंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निग मशीन, स्त्रीरोगतज्ञ, चेंजिंग रूम, सर्व दर्शनी भागात महिला सुरक्षा हेल्पलाइन क्रमांक, दर दहा किलोमीटर अंतरावर विसावा कक्ष, स्तनपान मातांसाठी हिरकणी कक्ष तसेच निर्भया पथक आदी सुविधा महिलांकरिता ठेवण्यात आलेल्या आहेत.
यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादीपुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अतिरिक्त पोलीस आयुक्त ( ग्रामीण) मिनेश घट्टे, उपायुक्त अविनाश सपकाळ, घनकचरा विभागातील उपायुक्त आशा राऊत, सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हुंकारे, शाखा अभियंता सिमरन पिरजादे, डॉ.संदीप धेंडे, माजी नगरसेवक वनराज आंदेकर, विशाल धनवडे, नंदा लोणकर, रवींद्र माळवदकर, आदी राजकीय, सामाजिक, प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे चाकणकर म्हणाला की, आपल्याकडे गृह विभागाचे खाते हे देवेंद्र फडवणीस यांच्याकडे आहे. ही यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. अनेक महिला व मुली बेपत्ता असल्याचे पोलीस खात्यातील रेकॉर्ड त्यांनी बोलून दाखविले.
यावेळी महिला व मुलींना नोकरीचे आमिष दाखवून बाहेर गावी नेऊन त्यांची फसवणूक केली जाते. याकरिता पालकमंत्री या नात्याने महिलांच्या सुरक्षितेसाठी कठोर पावले उचलावी अशी मागणी यावेळी चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांना केली. त्याच बरोबर तृतीयपंथी यांना कोरोना काळात आरोग्याच्या सुविधा मिळत नव्हत्या.
डॉक्टर देखील तपासात नव्हते. त्यांचा अंत्यविधी कुठे करायचा ही देखील समस्या उद्भवली होती. जिवंतपणाचे वेदना कमी असतील इतक्या मरण्याच्या वेदनांची दुर्दशा त्यांची झाली होती. सरकार बदलल्यामुळे ससून रुग्णालयात प्रलंबित असलेले तृतीयपंथीयाकरिता 25 बेडचे विभाग खुले करावेत अशी मागणी ही यावेळी त्यांनी केली.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, पोलिसांची यंत्रणा मोठी आहे. तुम्ही सगळे मोबाईल बंद केले असले तरी तुमच्या मोबाईलचा सिग्नल हा पकडला जातो. आणि आपल्याला तो माणूस शोधता येतो. येत्या 15 तारखेला याविषयी पोलीस खात्याशी बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ससून रुग्णालयातील रखडलेलं तृतीयपंथी करिता विभाग व मनपाचे बापट रुग्णालयातही त्यांची व्यवस्था सुरू करू. महानगरपालिकेची वेगळी जागा उपलब्ध झाल्यास सीएसआर फंडातून तृतीयपंथींयाकरिता वेगळे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन ही यावेळी पाटील यांनी दिले. त्याचबरोबर वारीमध्ये स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कमालीचे कौतुक ही त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.