Ashadi Wari 2023 : साधु संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा ! माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या सोमवारी रात्री उशिरा शहरात दाखल झाल्या.
Ashadi Wari 2023
Ashadi Wari 2023sakal
Updated on

कँटोन्मेंट : दोन दिवस मुक्कामी असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी दर्शनाला लाखो भक्तांचा महासागर शहराच्या विविध भागांतून नाना पेठ व भवानी पेठेत दाखल झाला.

यंदा पाऊस नसल्याने सुमारे 3 ते 4 किलोमीटर लांबच लांब रांगेत थांबून पालख्यांतील पादुकांचे मनोभावे दर्शन घेताच कृतकृत्य झाल्याचे भाव भक्तांच्या चेहर्‍यांवर जाणवत होते. १२ जून रोजी सायं 7 वाजल्यापासूनच दुसऱ्यादिवशी आज उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या सोमवारी रात्री उशिरा शहरात दाखल झाल्या. दोन्ही पालख्यांसोबत लाखो वारकर्‍यांच्या आगमनामुळे संपूर्ण शहरात चैतन्यमय वातावरण होते.

शहरातील भवानी पेठ याठिकाणी संत ज्ञानेश्वरांची तर नाना पेठेमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी आहे. दोन्ही पालख्यांसोबत शहरात शेकडो दिंड्या दाखल झाल्या असून त्यात लाखो वारकर्‍यांचा समावेश आहे.

पेठांतील सोसायटीतील पार्किंग, मनपातील शाळा, टिंबर मार्केट मधील काही गोडाऊन रिकामे करून काही व्यापाऱ्यांनी देखील वारकऱ्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच विविध ठिकाणी दिंड्या उतरल्या आहेत.

दिंड्यांमध्ये आलेल्या वारकर्‍यांकडून दिवसभर कीर्तन, भजन, हरिपाठाचे मनन करण्यात येत होते. दरम्यान, नाना पेठ, भवानी पेठ येथे मुक्कामी असलेल्या वारकर्‍यांसाठी ठिकठिकाणी चहा, फराळाची सोय करण्यात आली होती. तर मोफत चपला शिवून देणे, जेवण, रेनकोट वाटप असे उपक्रम विविध संस्था, मंडळांकडून सुरू होते.

यावेळी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, संयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, उपायुक्त संदीप गिल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, संदीप खर्डेकर, सरस्वती शेंडगे, विजय लक्ष्मी हरिहर आधी राजकीय, सामाजिक, शासकीय अधिकारी, पदाधिकारी हे दर्शनासाठी उपस्थित होते.

Ashadi Wari 2023
Ashadhi Wari : पंढरीची वारी आहे माझ्या घरी! ३५ वर्षांपासून दापोडीतील दोन मैत्रिणींची एकत्र पायीवारी

काल रात्री 9:30 वा. पालखीचे आगमन होऊन भाविकांना दर्शन दर्शन सुरू करण्यात आले. आतापर्यंत सुमारे अडीच ते तीन लाख लोकांनी दर्शन घेतले आहे. आणि उद्या पर्यंत हा आकडा दहा लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तसेच उद्या 14 जून रोजी पहाटे सहा वाजता माऊलींचे प्रस्थान होणार आहे. त्याआधी पहाटे पाच वाजता माऊलींचा अभिषेक करण्यात येईल. यावेळी मंदिर फक्त अर्धा तास बंद ठेवण्यात येईल. असे भवानी पेठ पालखी विठोबा मंदिर चे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे यांनी माहिती देताना सांगितले.

तसेच ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी लहान-थोर रांगेत उभे होते. ठिकठिकाणी वारकर्‍यांच्या मुखातून घुमणार्‍या ‘माऊली’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. त्यात दर्शनासाठी आलेले भाविकही मनोभावे ज्ञानोबा-तुकोबांच्या नावाचे मनन करीत आहे. त्यामुळे परिसरातील भक्तिमय वातावरण शिगेला पोहचले. डोक्यावर टोपी आणि कपाळी टिळा लावून तरुणाईही परिसरात मोठ्या संख्येने वावरत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

Ashadi Wari 2023
Ashadi Wari 2023 : 'माऊली, माऊली' च्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान

मुक्कामी असणार्‍या पालख्या आणि वारकर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर परिसरात सीसीटिव्हीद्वारे हालचालीवर करडी नजर ठेवण्यात आली होती.

ठिकठिकाणी थांबून पोलिस ठेहळणी करीत होते. दर्शनासाठी येणार्‍या भक्तांना पोलिस मार्गदर्शन करीत होते. तसेच खबरदारी घेण्यासाठी वेळोवेळी सूचनाही करीत होते. अनेक वैद्यकीय महाविद्यालयांकडून वारकर्‍यांना आरोग्य सेवा पुरविल्या जात आहे.

Ashadi Wari 2023
Ashadi Wari 2023 : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचे देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान

रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. दर्शनाच्या रांगेला शिस्त लावण्यासाठी पोलिस खडा पहारा देत होते. नाना पेठ तसेच भवानी पेठेत राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, मंडळांकडून वारकर्‍यांचे स्वागत करणारे फ्लेक्स ही लावण्यात आले होते. त्याच बरोबर मंदिरातील सहा विश्वस्त 200 सेवेकरी, पोलीस अधिकारी व कर्मचारी अशा सुमारे हजार सेवेंकरीकरिता भोजनाची व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती कोंढरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.