Success Story : लहान मुलगी आणि संसाराची जबाबदारी; जिद्दीने केलेला मैदानी सराव 'अश्वीनी'ची पोलीस पदी निवड

शेतकरी कुटुंबातील अश्वीनी विकास गायकवाड यांनी विवाहानंतर अडीच वर्षाची लहान मुलगी तसेच संसाराची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत जिद्दीने वर्षभर दररोज दोन तास मैदानी सराव करून पोलीस पदी निवड
ashwini gaikwad success story of becoming police pune
ashwini gaikwad success story of becoming police punesakal
Updated on

पारगाव : पोंदेवाडी ता. आंबेगाव येथील शेतकरी कुटुंबातील अश्वीनी विकास गायकवाड यांनी विवाहानंतर अडीच वर्षाची लहान मुलगी तसेच संसाराची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत जिद्दीने वर्षभर दररोज दोन तास मैदानी सराव करून पोलीस पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी मिरवणूक काढून नागरी सत्कार केला आहे.

येथील रोडेवाडी येथील गायकवाड कुटुंबातील सुन आश्विनी गायकवाड यांनी विज्ञान विभागातुन बारावी ऊत्तीर्ण झाल्यावर त्यांचा विवाह झाला विवाहानंतर पती व सासरच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी पुढे शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला सध्या त्या विज्ञान विभागात व्दितीय वर्षात शिक्षण घेत आहे.

आश्विनी गायकवाड यांना अडीच वर्षाची लहान मुलगी आहे. गेली एक वर्ष त्या पाच किलोमीटर अंतरावरील पारगाव येथे पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण देणाऱ्या सक्षम अकॅडमी मध्ये पोलीस भरतीसाठी मैदानी सरावाला जात होत्या दररोज त्यांचे पती विकास गायकवाड हे त्यांना मोटारसायकल वरून पारगाव येथे सोडायला व आणायला जात होते.

ashwini gaikwad success story of becoming police pune
Success Story: राज्यात 'या' ठिकाणी बनलेले बाप्पा पोहचले फॉरेनला; शेट्टी दाम्पत्याकडे मूर्तींची मागणी वाढती !

अडीच वर्षाची लहान मुलगी तसेच संसाराची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत जिद्दीने वर्षभर दररोज दोन तास मैदानी सराव करून त्यांनी तयारी केली असून नुकतीच त्यांची संभाजीनगर पोलीस दलात पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी मिरवणूक काढुन फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत नागरी सत्कार केला.

या सत्कार सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, पोंदेवाडीचे उपसरपंच महेंद्र पोखरकर, माजी उपसरपंच संदिप पोखरकर दिलीप पवळे, सुरेखा निघोट, अरुणा घोडे ,

ashwini gaikwad success story of becoming police pune
Pune: नवले पूलाच्या सर्व्हिस रोडने घेतला मोकळा श्वास, अतिक्रमणावर फिरला मनपाचा बुलडोझर

भरत मोरे, महेश वाघ, सचीन लबडे, जयसिंग पोंदे, पोपट रोडे, बबन नाना वाळुंज,विठ्ठल मखर, ,सुशांत रोडे, बाळासाहेब रोडे, संतोष पंचरास, ,संदिप तांबे, संदिप गायकवाड, किरण शांताराम ढोबळे, सुरज हिंगे, सदाशिव हारके आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले तर आभार बाळासाहेब रोडे यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.