Pune Bypoll Election : "टिळकांची जागा घेण्यासाठी भाजपचे इच्छूक उमेदवार गिधाडासारखी वाट बघत होते"

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून त्या राज्यभर चर्चेचा विषय ठरल्या
Pune Bypoll Election
Pune Bypoll Election esakal
Updated on

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून त्या राज्यभर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. अशातच आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच आता सर्व नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. काल महाविकास आघाडीच्या वतीने प्रचार सभा घेण्यात आली होती. यावेळी जिल्हा काँग्रेस शहरअध्यक्ष अरविंद शिंदे यांनी बोलताना भाजपच्या नेत्यांवर कडाडून टीका केली आहे.

ते बोलताना म्हणाले की, "मुक्ता ताई २.५ वर्ष आजारी होत्या. अनेक जण भेटायला जात होती पण त्यांचे (भाजप) काही इच्छूक उमेदवार गिधाडा सारखी वाट बघत होती," अशी जहरी टीका पुणे शहर जिल्हा काँग्रेस शहरअध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आज एका भाषणात केली.

पुण्यात अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आज कसबा पोटनिवडणुकीचा प्रचारार्थ महविकास आघाडीने सभेचे आयोजन केले होतं. यावेळी भाषणात अरविंद शिंदे यांनी भाजपवर सडकून टीका केली.

Pune Bypoll Election
Devendra Fadanvis : पवारांपेक्षा ‘या’ नेत्याने सर्वात मोठा विश्वासघात केला; फडणविसांनी व्यक्त केली खदखद

मुक्ता ताई २.५ वर्ष आजारी होत्या. अनेक जण भेटायला जात होती पण त्यांचे (भाजप) काही इच्छूक उमेदवार गिधाडा सारखी वाट बघत होती. मुक्ता ताई यांनी केलेल्या विकासाचे काम हाच हेमंत रासने थांबवत होता आणि हे मी नाही सांगत मुक्ता ताई यांची पती शैलेश टिळक यांनी देवेंद्र फडणवीस यांना सागितलं आहे. लाज वाटली पाहिजे तुम्हाला की असा उमेदवार देता ज्याने मारण्याची वाट बघितली," असा घणाघात अरविंद शिंदे यांनी आज केला.

Pune Bypoll Election
Nagapur News : चिमुकलीने मच्छर मारण्याच्या औषधाची बाटली तोंडात घातली अन्….

"हेमंत रासने सलग ४ वेळा स्थायी समिती चे अध्यक्ष होते. महापालिकेचे अंदाज पत्रक ७-७.५ हजार एका वर्षाचा त्यांनी लागोपाठ ४ वर्ष सादर केलं म्हणजे २८,००० कोटींचा अंदाजपत्रक हेमंत रासने यांनी सादर केलं. त्यांच्या प्रभागात ५०० कोटी रुपयाची तरतूद केली होती पण तिथे विकासाची कामे केली नाहीत. हा प्रश्न प्रत्येक मतदाराने उमेदवाराला विचारले पाहिजे," असं शिंदे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.