वडगाव शेरी - महाविकास आघाडीची पंचसूत्री हा जाहीरनामा म्हणजे फक्त थापा आहेत. समोर पराभव दिसत असल्याने ‘खोटं बोल, पण रेटून बोल', असा धंदा त्यांनी सुरू केला आहे. त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी तीन लाख कोटी इतका वार्षिक निधी लागेल. केंद्रात समविचारी सरकार असल्याशिवाय हे शक्य नाही, अशा तिखट शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर हल्ला चढवला.