पुणे - 'आम्ही योजनांद्वारे लोकांना पैसे देऊ शकणार नाही, असे विरोधक म्हणत होते. आता तेच विरोधक, तिप्पट-चौपट वाढीच्या योजना लोकांपुढे आणत आहेत, मग हे कसे शक्य आहे? तुम्ही काय जादुची कांडी फिरवणार आहात का? याद्वारे विरोधकांकडुन नागरीकांच्या फसवणुकीचा प्रकार सुरु आहे,' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर टीकास्त्र सोडले.