पुणे - शहरी भागात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी विविध संघटनांनी पुढाकार घेतला आहे. मतदान केलेल्या व्यक्तींना पेट्रोल पंपावर एक लिटर इंजिन ऑइल खरेदी केल्यास ५० रुपयांचे पेट्रोल मोफत आणि हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलात १० टक्के सवलत दिली जाणार आहे. लोकशाहीच्या या उत्सवात पुणेकरांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन या वेळी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.