पुणे : ‘‘आगामी विधानसभा निवडणूक महायुती एकत्रित लढणार आहोत. ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात यावी आणि तेच मुख्यमंत्री राहावेत, अशी आमची सर्वांची इच्छा आहे. दरम्यान, याबाबतचा अंतिम निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते घेतील,’’ असे विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.