शनिवारवाड्याच्या दुरूस्तीसाठी केंद्रीय मंत्र्यांचे आश्‍वासन

शहराच्या मध्यवर्ती भागातील शनिवारवाड्याला देश-परदेशातून पर्यटक भेट देतात. पण गेल्या काही वर्षात शनिवारवाड्याच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाले आहे.
shaniwarwada pune
shaniwarwada puneSakal
Updated on

पुणे - शनिवारवाड्यातील भित्तिचित्र, निखळलेले दगड यासह इतर ऐतिहासिक ठेव्यांची दुरवस्था झाली असून, याच्या दुरूस्तीसाठीचा आराखडा केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री जी किशन रेड्डी यांना सादर केला होता. हा प्रस्ताव मान्य करून या कामासाठी १० कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून दिली जाईल असे अश्‍वासन दिले असल्याचे आमदार मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

वास्तुविशारद कलमदाणी किरण, इतिहासाचे अभ्यासक उदय कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

शहराच्या मध्यवर्ती भागातील शनिवारवाड्याला देश-परदेशातून पर्यटक भेट देतात. पण गेल्या काही वर्षात शनिवारवाड्याच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अनेक गोष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शनिवारवाड्याची देखभाल ही केंद्र शासनाच्या पुरातत्त्व खात्याकडून केली जाते, त्यामुळे पेशवेकालीन भित्तिचित्र, वाड्याचे बांधकाम, यासह इतर गोष्टींचे संवर्धन करावे यासाठी डॉ. उदय कुलकर्णी व पुरातत्त्व खात्याचे गजानन मंडवले, किरण कलमदानी यांच्याशी चर्चा करुण पुन्नरुज्जीवनाचा सर्व आराखडा तयार केला. त्यासाठी येणारा खर्चाचा अंदाज याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री रेड्डी यांना पाठवला होता. यापत्राची दखल केंद्रीय मंत्री रेड्डी घेतली असून, राज्यातील सर्व ऐतिहासिक स्थळांची सुरक्षा व देखभाल केली जाईल असे आश्वासन दिले आहे, असे टिळक यांनी सांगितले.

shaniwarwada pune
पुणे शहरात थंडीचा कडाका वाढला

‘‘शनिवार वाड्यातील ऐतिहासिक दिल्ली दरवाजा व त्यावरील चित्रे दर्शनी बाजूची भिंत ,निखळलेले दगड पुन्हा बसवणे आदी कामे करण्यात येणार आहेत. यासाठी १० कोटी रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे. हे काम लवकरच सुरू होईल. ’

- मुक्ता टिळक, आमदार

रस्त्याबाबत मोघम उत्तर

शनिवारवाड्याच्या संवर्धनासाठी केंद्रीय मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला, पण भाजपची सत्ता असून देखील शनिवारवाड्याच्या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, तसेच अतिक्रमण व कचऱ्यामुळे हा परिसर अस्वच्छ झाला आहे याबाबत टिळक यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे, पण रस्ते दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच काम सुरू होईल. तसेच शनिवारवाड्याच्या सिमाभिंतीच्या आतील स्वच्छता महापालिकेला करता येत नाही. ही पुरातत्त्व विभागाकडूनच केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.