हडपसर : आपले विविध छंद जोपासण्याबरोबरच वानवडी येथील श्रीमती आशा शिंदे यांनी २००८ पासून गणेशाच्या विविध चित्रांचे कात्रण काढून त्याचा अल्बम बनविन्याचा छंद जोपासला आहे. देश विदेशातील प्रसिद्ध झालेल्या विविध चित्रांचा समावेश त्यामध्ये केला आहे. आज पर्यंत सुमारे चार हजार गणेश चित्रे त्यांनी जमविली असून या वर्षी त्यांच्या चित्र संग्रहाचा चौदावा अल्बम तयार होत आहे.
श्रीमती शिंदे या दिवंगत नँशनल चँपियन दत्ताजी शिंदे यांच्या पत्नी आहेत. पतीच्या अपघातानंतर त्यांनी पस्तीस वर्षे पतीने सुरू केलेला स्पोर्ट्स साहित्य विक्रीचा व्यवसाय सांभाळला. हा व्यवसाय सांभाळत असताना त्यांना आपल्या लेखन, वाचन, नाटक, गायन, चित्रकला, रांगोळी याबरोबरच वृत्तपत्रे व मासिकांमधून आलेल्या विविध विषयांवरील उपयुक्त माहिती, सुविचार, लेख यांची कात्रणे कापून ठेवण्याच्या छंदाला मुरड घालावी लागली. पीएमपीएल प्रवासी मंच, ज्येष्ठ नागरिक संघ या माध्यमातून त्या सामाजिक कामातही व्यस्त आहेत.
दरम्यानच्या काळात सार्वजनिक कार्याची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे १९९८ पासून त्या वृत्तपत्रातील वाचकांच्या पत्रव्यवहारसाठी पत्रे पाठवू लागल्या. त्याला प्रसिद्धी मिळाल्यामुळे उत्साह वाढत गेला. स्वच्छता, सार्वजनिक वाहतूक, गृहनिर्माण संस्था, सुविचार, क्रीडा, आरोग्य, प्लास्टिक, कचरा आदी विविध विषयांवरील कात्रणांचे संग्रह त्यांनी केले आहेत.
गेली चौदा वर्षांपासून त्यांनी गणेश चित्रांची कात्रणे काढण्याचा छंद जोपासला आहे. आज त्यांच्याकडे दर वर्षीच्या गणेशोत्सव काळात प्रसिध्द होणाऱ्या गणेश चित्रांचे चौद अल्बम तयार झाले आहेत. त्यामध्ये विविध प्रकारची सुमारे चार हजार गणेश चित्रे पाहायला मिळतात. वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांच्याकडून जोपासल्या गेलेल्या या छंदाचे कौतुक होत आहे.
"वृत्तपत्रातील रूप गणेशाचे या विषयावर प्रसिद्ध झालेली माहिती व रेखाचित्रे मनाला भावली. देशोदेशींचे गणपती आणि इतर माहितीही खूप आवडली. त्यांची कात्रणे कापून कागदावर चिकटवून छोटासा अल्बम तयार केला. त्यामुळे वयाच्या ६६ व्या वर्षी झालेला आनंद व मानसिक समाधान मोठे होते. आता दरवर्षी श्री गणेश चित्रांच्या कात्रणांचा संग्रह करत आहे. यंदाचा १४ वा संग्रह आहे. सकाळमुळे मला प्रत्येक उपक्रमात प्रोत्साहन मिळाले आहे, असे आशा शिंदे यांनी सांगितले."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.