पुणे : 'कोरोना'मुळे ऑनलाईन शिक्षणाला महत्त्व प्राप्त होत असताना 'अॅक्टिव्ह टीचर्स फोरम' (एटीएफ) या शिक्षक गटाने राज्यातील एक हजार १८६ शाळांमधील १.६७ लाख विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये ४५ टक्के मुलांच्या पालकांकडे स्मार्टफोन आहे तर, २७ टक्के पालकांकडे इंटरनेट आहे. त्यामुळे 'कोरोना' नंतर घरातून फक्त देण्यासह टीव्ही, रेडिओ यासह इतर माध्यमांचा विचार करणे गरजेचे आहे, असे आवाहन 'एटीएफ'ने केले आहे.
लॉकडाऊननंतर शालेय मुलांपैकी राज्यातील किती मुलांना ऑनलाईन अभ्यास करणे शक्य आहे, जूननंतर शाळा सुरू झाल्या नाहीत तर काय होईल या विचाराने ‘एटीएफ’ने सर्वेक्षण केले. राज्यात एकूण १ लाख ९ हजार शाळा आहेत, त्यापैकी ६६ हजार शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. गेल्या काही वर्षात राज्यातील ६५ हजार शाळा डिजिटल झाल्या आहेत. यापैकी या सर्वेक्षणात राज्यातील सर्व प्रकारच्या १ हजार १८६ शाळांमधील १ लाख ६७ हजार ६८७ मुलांची माहिती संकलित करण्यात आली. यात जिल्हा परिषदेच्या १ हजार ५४ शाळा आहेत. या शाळांमधील ९७ हजार ७९४ मुलांपैकी ५२ हजार ५५८ मुलांच्या घरी टीव्ही आहे. तर ३ हजार ४६९ मुलांकडे लॅपटॉप, संगणक आहेत. ६८ हजार ५० विद्यार्थ्यांच्या पालकांकडे साधे फोन आहेत तर ३६ हजार ३०० पालकांकडे स्मार्टफोन आहेत. तर २० हजार ४२२ पालकांकडे इंटरनेट आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
महापालिका, नगरपालिकेच्या २१ शाळांमध्ये शाळांमधील ४ हजार २८० पैकी एक हजार ३७६ पालकांकडे स्मार्टफोन असले तरी ६११ म्हणजे केवळ १४ टक्के स्मार्टफोनला इंटरनेटची जोडणी आहे. खासगी अनुदानित शाळांमधल्या ४३ हजार ३१२ मुलांपैकी २२ हजार ८६० पालकांकडे स्मार्टफोन असून ३५ टक्के स्मार्टफोनला इंटरनेटची जोडणी आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
खासगी विनाअनुदानित शाळांमधल्या २२ हजार ३०१ पैकी ९ हजार ३८५ म्हणजे ४२ टक्के पालकांकडे स्मार्टफोनला इंटरनेटची जोडणी आहे, ही संख्या सर्वाधिक आहे. या एकूण १ लाख ६७ हजार विद्यार्थ्यांपैकी ८१ टक्के जणांच्या घरी टीव्ही आहे, असे या सर्वेक्षणात समोर आले आहे.
- ऑनलाईन शिक्षणाला महत्त्व येत असताना किती पालकांकडे स्मार्टफोन व इंटरनेट आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्वेक्षणात १ लाख ६७ हजार मुलांपैकी ४५ टक्के पालकांकडे स्मार्टफोन असले तरी केवळ २७ टक्के पालकांकडे इंटरनेट आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणापासून विद्यार्थी वंचित आहेत. लॉकडाऊननंतर टीव्ही किंवा रेडीओ या माध्यामातूनही चांगले शिक्षण देता येऊ शकेल. ते बहुतांश विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल यासाठी विचार करणे आवश्यक आहे.
- भाऊसाहेब चासकर, संयोजक, 'एटीएफ'
- राज्यात सुमारे १ लाख ९ हजारांहून अधिक शाळा आहेत, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 64 हजार शाळात आहेत. यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बहुतांश पालकांकडे अॅन्ड्राइड मोबाईल आहेत. ही संख्या काही लाखांत आहेत. काही भागांतील पालकांकडे हे मोबाईल नाहीत. त्यांची मुले देखील शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून शिक्षण विभाग डीटीएच वाहिनी सुरू करीत आहोत. त्याद्वारे त्यांच्यापर्यंत शिक्षण पोचविले जाईल.
- दिनकर पाटील (शिक्षण संचालक)
सर्वेक्षणात सहभागी शाळा, विद्यार्थी स्मार्टफोन, नेटचा वापर
शाळा- शाळा संख्या - विद्यार्थी - स्मार्ट फोन- टक्के- इंटरनेट- टक्के
जिल्हा परिषद-१०५४-९७७९४-३६३००- ३७.१२-२०४२२-२०.८८
मनपा-२१-४२८०-१३७६-३२.१५-६११-१४.२७
अनुदानित-५३-४३३१२-२२८६०-५२.७८-१५२०९-३५.१७
विनाअनुदानित-५८-२२३६१-१६०५१-७१.९७-९३८५-४२.०८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.