पुणे - कोंढव्यातील मिठानगरमध्ये सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटरचा दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पर्दाफाश केला आहे. पथकाने तब्बल तीन हजार ७८८ सीमकार्डसह सीम बॉक्स, वायफाय, सीमबॉक्स चालवण्यासाठी लागणारा अँटिना आणि लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाई एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.