Lonikand Police : न्हाव्याने चेष्टेत मारल्याने संतापलेल्या तरुणाचा फावड्याने दोन दुचाकीवर हल्ला; घटना सीसीटिव्हीत कैद

ज्ञानेश्वर हा बकोरी रोड वरील केश कर्तनलयात गेला. तिथे तेथील न्हाव्यासोबत त्याची चेष्टा मस्करी सुरू होती.
Wagholi Bakori Road Lonikand Police
Wagholi Bakori Road Lonikand Policeesakal
Updated on
Summary

फिर्याद दाखल झाल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी त्याला त्वरित अटक केली. त्याला न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

वाघोली : केश कर्तनालयात (Hair Salon) काम करणाऱ्या न्हाव्याने चेष्टा मस्करीत गालात मारल्याने चिडलेल्या तरुणाने रस्त्यावर येत दोन दुचाकीवर फावड्याने हल्ला केला. यामध्ये दुचाकीचे नुकसान झाले. सुदैवाने दुचाकी धारकांना इजा झाली नाही. ही घटना वाघोलीत बकोरी रोडवर (Wagholi Bakori Road) मंगळवारी दुपारी घडली. त्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

Wagholi Bakori Road Lonikand Police
Instagram वर बॉडीबिल्डिंग विषयी माहिती देतो असं सांगून महिलेच्या घरात घुसून तब्बल 'इतक्या' लाखांची चोरी

या प्रकरणी पराग भगवान कोल्हे (वय ३९ वर्ष, रा. ड्रिम संकल्प सोसायटी, बकोरी रोड, वाघोली) यांनी फिर्याद दिली असून ज्ञानेश्वर सोमनाथ निचळ (वय २० वर्षे, रा. सृष्टी पार्क जवळ, थेऊर) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर हा बकोरी रोड वरील केश कर्तनलयात गेला. तिथे तेथील न्हाव्यासोबत त्याची चेष्टा मस्करी सुरू होती. त्या न्हाव्याने त्याला गालात मारले.

Wagholi Bakori Road Lonikand Police
'या' अभिनेत्रीसह 101 सेलिब्रिटींचा रेव्ह पार्टीत सहभाग; कारवाई करत पोलिस आयुक्तांची पत्रकार परिषदेत माहिती

त्याचा राग आल्याने तो बाहेर रस्त्यावर आला व त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या पराग कोल्हे व धनराज खानगावकर यांच्या दुचाकीवर फावड्याने हल्ला केला. यामध्ये दुचाकीचे नुकसान झाले. सुदैवाने दोन्ही दुचाकी धरकला इजा झाली नाही. तसेच त्याने शिवीगाळ करत कोणी मध्ये आले तर जिवे ठार मारून टाकेल, अशी धमकी देवून मोठमोठ्याने आरडा ओरडा सुरू केला. यामुळे नागरिकही घाबरले. फिर्याद दाखल झाल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी त्याला त्वरित अटक केली. त्याला न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. पुढील तपास लोणीकंद पोलीस (Lonikand Police) करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.