Pune Crime : जमिनीच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार; हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जमिनीच्या वादातून सिंहगड रस्त्यावरील खडकवासला येथील कोल्हेवाडी येथे तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले
attack on youth over land dispute case register in haveli police station pune
attack on youth over land dispute case register in haveli police station puneesakal
Updated on

किरकटवाडी : टोळीयुद्ध किंवा दहशत माजविण्यासाठी वापरला जात असलेला 'कोयता' आता भावकीतील भांडणापर्यंत पोहोचला आहे. जमिनीच्या वादातून सिंहगड रस्त्यावरील खडकवासला येथील कोल्हेवाडी येथे तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले असून यात संकेत मनोहर मते (वय 31, रा. खडकवासला) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

attack on youth over land dispute case register in haveli police station pune
Nandurbar Crime News : आमलाड-बहुरुपा रस्त्यावर 8 लाखांचा मद्यसाठा जप्त

याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रभारी अधिकारी अनमोल मित्तल यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संकेत मते व त्यांच्या भावकीतील इतरांमध्ये वडिलोपार्जित जमिनीवरुन वाद सुरू आहेत.

आज दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास संकते मते व त्यांच्या घरातील इतर सदस्य कोल्हेवाडी येथील शेतात असताना भावकीतील काही पुरुष व महिला तेथे आले. त्यावेळी झालेल्या शाब्दिक बाचाबाचीतून संकेत मते याच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आले.

attack on youth over land dispute case register in haveli police station pune
Pune Crime : देशभरात विविध एटीएम मधून पैसे चोरणाऱ्यांना इंदापूर पोलिसांनी केले पंजाबमधून दोघांना अटक

गंभीर जखमी झालेल्या संकेतला जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या डोक्याला तब्बल चौतीस टाके पडले आहेत. याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत आरोपींची नावे निश्चित झाले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस अनमोल मित्तल यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.