Crime News : कोंढावळे खुर्दमध्ये शेतकऱ्याच्या मुलीला जीवंत पुरण्याचा प्रयत्न ;४ जणांविरोधात गुन्हा दाखल

खासदार सुप्रिया सुळे यांनी केला घटनेचा निषेध
Crime News
Crime news esakal
Updated on

वेल्हे : राजगड तालुक्यात कोंढावळे खुर्द मध्ये शेतकऱ्याच्या मुलीला जीवंत पुरण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना बुधवार (ता.२९ ) घडली होती. याप्रकरणी तक्रारदार तरुणी व तिच्या आईची वेल्हे पोलिसांनी दखल न घेतल्याने यांनी पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयात धाव घेतल्यावर अखेर शुक्रवार (ता.३१) रोजी पहाटे साडेतीन च्या दरम्यान ४ जणांसहीत इतर दहा ते बारा अनोळखी इसमांनवर हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Jalgaon News : पारोळा बसस्थानक बनले वाहनतळही; चालकवाहकांसह प्रवाशांनाही त्रास

याबाबत पोलिस उपनिरीक्षक अप्पासाहेब पडळकर म्हणाले, याबाबत तरुणीची आई कमल बबन खोपडे (वय.४५) रा.कोंढावळे खुर्द ता.वेल्हे(राजगड) यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी संभाजी नथू खोपडे,तानाजी नथू खोपडे,दोघेही राहणार रा.कोंढावळे खुर्द.वेल्हे(राजगड) ,बाळू भोरेकर, पूर्ण नाव माहीत नाही राहणार वेल्हे(ता.वेल्हे ) तर उमेश रमेश जयस्वाल राहणार मुंबई व इतर दहा ते बारा अनोळखी इसमांनवर हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Jalgaon Crime News : गुजरातला पळून जाताना साक्रीहून 6 संशयित ताब्यात

पुणे जिल्ह्यातल्या राजगड तालुक्यातील कोंढावळे येथे ही घटना घडली होती. काही जणांनी जमिनीच्या वादातून शेतकऱ्याच्या मुलीच्या अंगावर जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून तिला शेतामध्ये जीवंत पुरण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती.

Crime News
Nashik News : होळकरकालीन वास्तूंचे व्हावे संवर्धन; किल्ले, मंदिर, बारव, घाट वास्तू कलेचा उत्कृष्ट नमुना

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्यादीत म्हंटले आहे बुधवार (ता.२९)रोजी सायं चार वाजण्याच्या सुमारास आरोपी यांनी तीन ट्रॅक्टर एक जेसीबी घेऊन येऊन त्यांनी सर्वांनी मिळून फिर्यादी यांच्या शेतात येऊन यांची मुलगी प्रणाली हिस जेसीबीच्या पटरीने धडक देऊन ती जमिनीवर पडलेली असताना तिला जमिनीत गाडून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्या अंगावर माती टाकून तिला गाडण्याचा प्रयत्न केला तसेच वरील सर्व आरोपी यांनी मिळून शिवीगाळ करून दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे . याप्रकरणी सर्व आरोपी फरार असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष तीन पथकांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक अप्पासाहेब पडळकर दिली.

या घटनेचा तीव्र निषेध खासदार सुप्रिया सुळे यांनी केला असून याबाबत त्या म्हणाल्या, 'झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी असून मी या घटनेचा तीव्र निषेध करत असून महाराष्ट्र सरकारला मी हा प्रश्न विचारत आहे नक्की पुणे शहर व जिल्ह्यात चाललंय काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.