पुणे : बनावट अधिकारपत्राद्वारे वाघोलीतील १० एकर जागा बळकावण्याचा प्रयत्न

बनावट आधारकार्ड तयार करून बनावट अधिकारपत्राद्वारे वाघोलीतील 10 एकर जागा बळकाविण्याचा प्रयत्न
document fraud
document fraudsakal
Updated on

वाघोली : मुळ मालकाचे नावाने स्वतःचा फोटो लावून बनावट आधारकार्ड तयार करून बनावट अधिकारपत्राद्वारे वाघोलीतील 10 एकर जागा बळकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेसह तिघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिल राजाराम सणस (वय 46, रा. टिंगरेनगर) यांच्या फिर्यादीनुसार सुमन दत्ता लोंढे (वय 30, रा. वारजे), मनोज एकनाथ शिंदे (वय 28, रा. शिरूर), राजेंद्र रमेश सोदे (वय 40, रा. वारजे माळवाडी) या तिघांविरोधात तीन लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Attempt to grab 10 acres of land in Wagholi by making fake Aadhar card)

document fraud
बेळगाव : शहर परिसरातील तलाव अतिक्रमनाच्या विळख्यात

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुमन लोंढे या अपर्णा यशपाल वर्मा असल्याचे भासवून तिचे फोटोचे बनावट आधारकार्ड तयार केले. वर्मा यांच्या मालकीची वाघोली येथील 1276 मधील 10 जागा बळकाविण्याच्या हेतूने आर्थिक फायद्यासाठी जागेचे बनावट अधिकारपत्र विश्वनाथ कांबळे यांना नोटराईज करून दिले. अधिकारपत्र खरे आहे असे भासवून कांबळे यांच्याकडून 5 लाख रुपये घेऊन फसवणूक केली. वर्मा व कांबळे यांची फसवणूक केल्याप्रकरणी महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सामील आणखी इतर व्यक्तींचा शोध पोलीस घेत आहे.(Pretending to have a power of attorney, he took Rs 5 lakh from Kamble and cheated him)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.