औंध - संततधार पावसामुळे औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयांतर्गत परिसरात पाण्याचा फटका बसल्याने जनजीवन विस्कळित झाले. बोपोडी येथील आदर्श नगर परिसरात घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांना पालिकेच्या राजेंद्र प्रसाद शाळेत हलवण्यात येत आहे.
पन्नास ते साठ घरांमध्ये पाणी शिरले असून आजारी व्यक्ती, वृध्दांना खुर्चीवरून बाहेर काढण्यात आले. तर चंद्रमणी संघ वसाहतीत घराणही पाणी शिरल्याने येथील रहिवाशांना चिखलवाडी येथील माता रमाबाई आंबेडकर शाळेत हलवण्यात आले आहे.
राजाण्णा चाळ, पठाण चाळ येथील घरांमध्येही पाणी शिरले होते. तसेच पडळ वस्ती, बोपोडी गावठाणातही नागरिकांचे हाल झाले. तर हॅरीस पुलापासून छाजेड पेट्रोल पंपापर्यंत पाणी साचल्याने वाहतूक बंद झाली होती. तर सिंध सोसायटी प्रवेशद्वार ते सकाळनगर परिसरातही पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती.
पालिकेच्या वतीने पाण्याचा निचरा करणे, झाडे हटवण्याची कार्यवाही करण्यात आली. औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त गिरीश दापकेकर यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
नागरीकांना कुठल्याही गैरसोयीला सामोरे जावे लागू नये यासाठी उपाययोजना करण्याची सूचनाही केल्या. शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी राजेंद्र प्रसाद शाळेत स्थलांतरित करण्यात आलेल्या रहिवाशांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
बोपोडीतील आदर्श नगरमधील आजारी, वृध्दांना खुर्चीवरून बाहेर काढण्यात आले. तसेच कॉंग्रेस, भाजपच्या स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी यावेळी रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.
कुठे शिरले पाणी?
* सुतारवाडी स्मशानभूमी व सुतारवाडी रस्ता
* औंध स्मशानभूमी
* बोपोडी स्मशानभूमी
* आदर्श नगर वसाहत, बोपोडी
* स.नं.५३/५४ येथील वसाहत बोपोडी.
* पडळ वस्ती औंधरस्ता
* चंद्रमणी वसाहत औंधरस्ता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.