औरंगाबादचा 'अर्जून' आणि 'भक्ती' कात्रजच्या प्राणी संग्रहालयात

१५ दिवसांसाठी क्वारंटाईन; उद्यान चालू झाल्यास पुणेकरांना होणार दर्शन
कात्रजच्या प्राणी संग्रहालयात
कात्रजच्या प्राणी संग्रहालयातsakal
Updated on

कात्रज : प्राणी हस्तांतरण प्रक्रियेअंतर्गत निलगाईच्या मोबदल्यात कात्रज (katraj) येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात (Rajiv Gandhi Zoological Park) वाघांची जोडी दाखल झाली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले असून प्राणीसंग्रहालय चालू झाल्यास लवकरच या दोन्ही वाघांचे पुणेकरांना (pune) दर्शन होईल. महापालिका आणि केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडून मान्यता मिळाल्यास हस्तांतरण प्रक्रियेतून औरंगाबाद येथून एक नर आणि एक मादी अशा दोघांना पुण्यात आणण्यात आले आहे. राजीव गांधी प्राणी संग्रहालयात दाखल झालेल्या वाघाचे नाव अर्जुन असून तो सात वर्षाचा आहे. तर वाघीणीचे नाव भक्ती असून ती चार वर्षाची असल्याची माहिती प्राणीसंग्रहालय प्रशासनाने दिली आहे.

औरंगाबादमधून २०१५ला पुण्याला एक पांढरा वाघ आणि एक वाघीण दिली होती. आता परत दोन वाघ देण्यात आले आहेत. त्यामुळे कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या वाढून ती आठ झाली आहे. यापूर्वी प्राणी संग्रहालयात ३ नर आणि ३ मादी मिळून सहा वाघ होते. त्यापैकी दोन पांढरे आणि चार पिवळे पट्टेरी वाघ आहेत. तर उद्यानात आता एकूण १० निलगायी होत्या. त्यापैकी २ नीलगायी वाघाच्या बदल्यात औरंगाबादला देण्यात आल्याने त्यांची संख्या झाली आहे.

पिंजऱ्यात बसण्यासाठी लागले अर्जून, भक्तीला चार तास!

सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील अर्जून व भक्ती ही पिवळ्या वाघांची जोडी शनिवारी (ता. १४) रात्री पुण्याला रवाना झाली. पुण्याला रवाना होण्यापूर्वी पिंजऱ्यात जाण्यासाठी या जोडीने अधिकाऱ्यांना घाम फोडला. त्यांना पिंजऱ्यात बसविण्यासाठी तब्बल चार तास लागले. वाघांच्या जोडीच्या बदल्यात महापालिकेला मात्र नीलगाई मिळाल्या आहेत. सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात १४ वाघ होते. मात्र, प्राणिसंग्रहालयात अपुरी जागा असल्याने पुणे येथील राजीव गांधी झुऑलॉजिकल पार्कने सेंट्रल झू ॲथॉरिटीकडे पिवळ्या वाघाच्या एका जोडीची मागणी केली होती. त्यानुसार सेंट्रल झू ऑथॅरिटीने औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालय संचालकांना वाघाची एक जोडी पुण्याला देण्यासंदर्भात पत्र दिले होते.

अखेर अर्जुन पिंजऱ्यात गेला

वाघांची जोडी घेऊन जाण्यासाठी पुणे महापालिकेचे पथक शनिवारी सायंकाळी दाखल झाले. पथक येईपर्यंत दोन्हीही वाघ पिंजऱ्यात बंद करण्याची योजना प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी आखली. त्यानुसार वाघांच्या पिंजऱ्यासमोर छोटे पिंजरे लावण्यात आले. या पिंजऱ्यात अर्जुन आणि भक्तीला बसवण्याचे प्रयत्न सुरु झाले. अर्जुनने चार तास कर्मचाऱ्यांना झुंजवले. अखरे अर्जुन पिंजऱ्यात गेला. त्यापाठोपाठ भक्ती देखील पिंजऱ्यात जाऊन बसली. दरम्यान, पुण्याहून आणलेल्या नीलगायी सिध्दार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयाच्या स्वाधीन करण्यात आल्या आणि दोन्हीही वाघ घेऊन रात्रीआठ वाजेच्या सुमारास हे पथक पुण्याला रवाना झाले.

कात्रजच्या प्राणी संग्रहालयात
Pegasus: सरकारला दिलासा; SC नं दिली 'या' गोष्टी गुप्त ठेवण्याची सूट

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीनं कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे महत्त्वाचं आहे. संग्रहालयात नेहमी पर्यटकांची गर्दी असते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील २० महिन्यांपासून प्राणीसंग्रहालय बंद असले तरी संग्रहालय पर्यटकांसाठी खुले झाल्यावर नवीन वाघ पाहण्याची संधी मिळणार आहे. वाघांना आता काही दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यांची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. त्यांना पुण्याचे वातावरण मानते की नाही हे पाहणे गरजेचे आहे. तसेच उद्याने खुली झाल्यावर पुणेकरांसाठी ही वाघांची जोडी पाहणे एक पर्वणी ठरणार आहे. - ज्ञानेश्वर मोळक, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.