पुणे - भारतीय सशस्त्र दलाला वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या सशस्त्र दल वैद्यकीय सेवेतील (एएफएमएस) डॉक्टर, परिचारिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील प्रशिक्षण देणारी संस्था म्हणजेच येथील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी). देशातील अग्रगण्य वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एएफएमसीने या वर्षी आपल्या स्थापनेचे ७५ वर्षे पूर्ण केली असून एका महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. तर आता एएफएमसीला राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रेसिडेंट्स कलर पुरस्वॉकराने गौरविण्यात येणार आहे.
‘प्रेसिडेंट्स कलरल'ला ‘राष्ट्रपती का निशान’ असे ही म्हणले जाते व हा सशस्त्र दलातील कोणत्याही तुकडीला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. एएफएमसी हे वैद्यकीय शिक्षणातील नैतिकतेसाठी आणि प्रशिक्षणाच्या सर्वोच्च मानकांसाठी जगभरात ओळखले जाते.
महाविद्यालयातील प्रशिक्षण आणि प्रशासकीय पायाभूत सुविधा केवळ वैद्यकीय शिक्षणातच सर्वोत्तम नाही तर येथील प्रशिक्षणार्थ्यांना विविध क्रीडा आणि अभ्यासेतर क्रियाकलापांच्या क्लबद्वारे सर्वांगीण विकासाची संधी देखील प्रदान करते. या प्रतिष्ठित संस्थेतून वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणारे कॅडेट्स सैन्यदल, हवाईदल आणि नौदलाच्या वैद्यकीय विभागात अधिकारी म्हणून दखल होत सेवा पुरवतात.
अधिकारी आणि डॉक्टर या नात्याने ते केवळ सीमेवर तैनात असलेल्या जवानांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबीयांना देखील उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा देतात. एएफएमसीच्या माजी विद्यार्थ्यांनी आरोग्य सेवा क्षेत्रात आणि संशोधनामध्ये उत्कृष्ट योगदान दिले आहे. तसेच विविध नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य सेवा संस्थांमध्ये कार्य करत आहेत. त्यामुळे हा पुरस्कार एएफएमसीच्या ७५ वर्षांच्या देशासाठी केलेल्या अनुकरणीय सेवेचा दाखला आहे.
एएफएमसीच्या कॅप्टन देवाशिष शर्मा कीर्ती चक्र परेड मैदानावर हा सन्मान सोहळा १ डिसेंबरला होणार आहे. यावेळी होणाऱ्या संचलन सोहळ्यात सहभाग घेणाऱ्या सशस्त्र दलाच्या चार तुकड्यांचे नेतृत्व महिला वैद्यकीय अधिकारी करणार असून महिला सक्षमीकरणाचा हे प्रतीक कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट असेल. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष चिन्ह आणि स्टॅम्पचे प्रकाशन केले जाणार आहे. तसेच ‘प्रज्ञा’ या कॉम्प्युटेशनल मेडिसिनचे उद्घाटन देखील होणार आहे. ज्याच्या माध्यमातून एएफएमसीला कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून अत्याधुनिक आरोग्यसेवा संशोधन करणाऱ्या आघाडीच्या संस्थांमध्ये स्थान मिळेल.
या दिमाखदार सोहळ्याला केंद्र, राज्य सरकार आणि सशस्त्र दलातील वरिष्ठ मान्यवर त्याचबरोबर एएफएमसीचे माजी प्रमुख, माजी संचालकांसह अधिष्ठाता आदी उपस्थित राहणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.