Ayodhya Ram Mandir : श्रीराम मंदिराचे भव्य प्रवेशद्वार साकारले एका दानातून !

श्रीराम जन्मभूमीच्या पूर्वेकडील सीमा भिंतीला लागूनच अमावा राम मंदिर आहे.
श्रीराम मंदिराचे भव्य प्रवेशद्वार
श्रीराम मंदिराचे भव्य प्रवेशद्वारsakal
Updated on

अयोध्या : लगतच्या एका मंदिराच्या विश्वस्तांनी दाखवलेल्या औंदार्यामुळे रामजन्मभूमीवर बांधण्यात येणाऱ्या श्रीराम मंदिराच्या भव्य प्रवेशद्वाराचा मार्ग साकार झाला. त्यासाठी एका निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याने पुढाकार घेतला, हे विशेष. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांची दखल घेतली आहे.

श्रीराम जन्मभूमीच्या पूर्वेकडील सीमा भिंतीला लागूनच अमावा राम मंदिर आहे. या मंदिराचा विस्तार 7 एकर जागेत आहे. बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील अमावा राजघराण्याचे हे मंदिर आहे. राजाचे निधन झाल्यावर अयोध्येतील या मंदिराकडे दुर्लक्ष झाले होते.

निवृत्त आयपीएस अधिकारी किशोर कुणाल हे बिहार मधील धार्मिक न्यास बोर्डाचे 10 वर्षांपूर्वी अध्यक्ष होते. या मंदिराबद्दलची माहिती त्यांना समजल्यावर त्यांनी पुढाकार घेतला. अयोध्येतील अमावा मंदिरातील अतिक्रमणे दूर करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. आता या मंदिराचे व्यवस्थापन बिहारमधील पाटणा येथील महावीर मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून होते आणि त्यावर किशोर कुणाल हे विश्वस्त आहेत.

मुख्य रामजन्मभूमीपासून हे मंदिर अवघ्या दीडशे मीटर अंतरावर आहे. मुख्य राम मंदिराचा आराखडा तयार झाल्यावर पूर्व दिशेला प्रवेशद्वार हवे होते. मात्र त्या ठिकाणी सात एकरात अमावा राम मंदिर होते.

अयोध्या जिल्हा प्रशासनाने किशोर कुणाल यांच्याशी सुमारे तीन वर्षांपूर्वी संपर्क साधला. त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यावर अमावा राम मंदिराचे दोन भागांत विभाजन करण्यात आले. त्यातून 82 फूट रुंद आणि 450 फूट लांबीचा रस्ता मुख्य राम मंदिरासाठी तयार आला. त्यामुळे रस्त्याच्या उजवीकडे 3.5 एकर आणि डावीकडे 1.5 एकर अशा जागेत अमावा राम मंदिराचे विभाजन झाले.

रस्ता झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या मंदिरांची दुरुस्ती अमावा राम मंदिराने स्वखर्चातूनच केली. राम मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन अमावा राम मंदिराने 'राम रसोई' सुरू केली आहे. त्यात रोज सुमारे 5 हजार भाविक भोजन करतात. येत्या काही दिवसात ही संख्या दहा हजारांपर्यंत जाऊ शकेल हे लक्षात घेऊन त्यानुसार अमावा राम मंदिराने नियोजन केले आहे.

तीन पंतप्रधानांचे सल्लागार

किशोर कुणाल हे 1972 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ए. एन. रॉय हे त्यांचे बॅचमेट. गुजरात केडरचे किशोर कुणाल हे सुमारे 18 वर्षे गृह मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर होते. या कालावधीत त्यांनी तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर, पी. व्ही. नरसिंहराव यांच्याबरोबर अयोध्याविषयक सल्लागार म्हणून काम केले.

2000 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर बिहार सरकारने त्यांची संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली. त्यानंतर बिहार धार्मिक न्यास बोर्डाचे अध्यक्ष त्यांना केले. आता गेल्या दहा वर्षांपासून किशोर कुणाल यांचे बहुतांश वास्तव्य आयोध्येतच असते अधून मधून ते पाटणा येथे कुटुंबाला भेटायला जातात.

- तीन कोटी नाकारले दहा कोटी दिले !

राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी दीड एकर जागा दिल्याबद्दल जिल्हा प्रशासनाने अवामा राम मंदिराला सुमारे तीन कोटी रुपये नुकसान भरपाई दिली. परंतु किशोर कुणाल यांनी ती रक्कम घेतली नाही, उलट महावीर मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून श्रीराम जन्मभूमी न्यासाला दहा कोटी रुपयांची देणगी दिली.

"अयोध्यातील घडामोडींशी गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ मी संबंधित आहे. त्यामुळे श्रीराम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी आम्ही तत्परतेने रस्ता उपलब्ध करून दिला. अमावा राम मंदिराचीही इतिहासात नोंद झाली, याचे आम्हाला समाधान आहे."

- किशोर कुणाल निवृत्त आयपीएस अधिकारी आणि विश्वस्त, महावीर मंदिर ट्रस्ट, पाटणा, बिहार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()