Ayurvedic Medicine : आयुर्वेद करणार कर्करोगावर इलाज ; पुण्यातील वैद्यांचे संशोधन,ज्येष्ठ नागरिकांवर प्रभावी उपचार शक्य

कर्करोग झालेल्या ज्येष्ठ नागरिकांवर आता प्रभावी उपचार करणे शक्य झाले आहे. त्यासाठी आयुर्वेदीय रसायन चिकित्सा उपयोगी ठरत असल्याचे संशोधन पुण्यातील वैद्यांनी केले आहे. त्याची दखल वैद्यकशास्त्रातील नामांकित नियतकालिकाने घेतल्याची माहिती पुढे आली.
Ayurvedic Medicine
Ayurvedic Medicine sakal
Updated on

पुणे : कर्करोग झालेल्या ज्येष्ठ नागरिकांवर आता प्रभावी उपचार करणे शक्य झाले आहे. त्यासाठी आयुर्वेदीय रसायन चिकित्सा उपयोगी ठरत असल्याचे संशोधन पुण्यातील वैद्यांनी केले आहे. त्याची दखल वैद्यकशास्त्रातील नामांकित नियतकालिकाने घेतल्याची माहिती पुढे आली.

रसायू कॅन्सर क्लिनिकने केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजी २०२४’च्या (एएससीओ) शिकागो येथे भरलेल्या जागतिक परिषदेमध्ये ‘जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजी’ या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित झाले.

कर्करोगाच्या वयस्कर रुग्णांच्या जीवनाच्या दर्जामध्ये सुधारणा होऊन चिंता व नैराश्य कमी झाले. आयुर्वेद रसायन चिकित्सा पद्धती रुग्णांकरिता सुरक्षित व परिणामकारक असल्याचे दिसून आले. या संशोधनामध्ये वैद्य योगेश बेंडाळे, अविनाश कदम, पूनम गवांदे, डॉ. धनश्री इंगळे आदींचा सहभाग होता.

का केले संशोधन?

  • वाढलेल्या वयामुळे तसेच इतर आजारांमुळे कर्करोगाचे उपचार घेण्यास रुग्ण पात्र ठरत नाही अथवा दुष्परिणामामुळे चिकित्सा थांबवावी लागते

  • पाश्‍चात्त्य वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णांना चांगल्या दर्जाचे आयुष्य देण्याकरिता

  • कर्करोगाच्या प्रगत अवस्थेतील ज्येष्ठ रुग्णांवर विद्यमान उपचाराच्या मर्यादा लक्षात घेऊन पर्याय शोधण्याकरिता

  • काही कर्करोगाचे रुग्ण पाश्‍चात्त्य चिकित्सा घेण्यास विविध कारणांमुळे अनुत्सुक असतात, त्यांना पर्याय देण्याकरिता

असे केले संशोधन

  • २०२० ते २०२३ दरम्यान ६५ वर्षांवरील अधिक वयाच्या कर्करोग रुग्णांचा अभ्यास केला

  • १०१० ज्येष्ठ कॅन्सर रुग्णांपैकी पात्र १६७ रुग्णांचा अभ्यास

  • कर्करोगाच्या प्रगत अवस्थेतील तसेच इतर व्याधिग्रस्त रुग्णांचा समावेश

  • ज्या रुग्णांनी सहा महिने किंवा अधिक काळ आयुर्वेद रसायन चिकित्सा सेवन केली त्यांचाच समावेश

  • चिकित्सा सुरू झाल्यावर तीन व सहा महिन्यांनंतर रुग्णाच्या जीवनाचा दर्जा कसा आहे याच्या विविध निष्कर्षांच्या नोंदींचा अभ्यास

निष्कर्ष काय?

  • रुग्णाच्या जीवनाच्या दर्जात सुधारणा झाली

  • चिंता व नैराश्य कमी झाले

  • रुग्णांत सकारात्मकता वाढून आजाराशी लढण्याचे सामर्थ्य वाढले

  • आयुर्वेद रसायन उपचार पद्धती सुरक्षित व परिणामकारक असल्याचे विविध जागतिक कसोट्यांवरून दिसून आले

  • रसायन चिकित्सा घरच्या घरी तसेच मुखावाटे सहज दिली जात असल्याने प्रगत अवस्थेतील कर्करोगाच्या ज्येष्ठ रुग्णांचा ही चिकित्सा घेण्याचा कल जास्त दिसून आला

  • कर्करोग झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सक्षम पर्याय म्हणून रसायन चिकित्सेचा विचार होऊ शकतो

  • रुग्णोपयोगी निष्कर्ष पाहता अधिकाधिक रुग्णांना याचा लाभ होण्याकरिता यावर अधिक संशोधनाची गरज

आयुर्वेद रसायन चिकित्सेमार्फत समाजातील या वर्गांकरिता पर्याय उपलब्ध आहे. यातून रुग्णांना मिळणारे समाधान, सुधारित आयुष्याचा दर्जा आणि संशोधनात्मक दृष्टी ठेवून केले जाणारे कार्य हे रसायू कॅन्सर क्लिनिकचे वैशिष्ट्य होय.

- वैद्य योगेश बेंडाळे,

रसायू कॅन्सर क्लिनिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.