माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादाक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट पुण्यात कर्वेनगर भागात रचण्यात आला होता असे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित प्रवीण लोणकरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
प्रवीणचा लोणकरचा भाऊ शुभम हा अद्यापही फरार आहे. पोलिस त्याच्या शोधात आहेत. शुभमच्या संपर्कात असलेल्या चौघांना मुंबई पोलिसांनी बुधवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे रुपेश मोहोळ, करण साळवे, शिवम मोहोळ आणि रियान खान अशी आहेत.