Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबबातची 'ती' पोस्ट करणाऱ्या शुभम लोणकरच्या भावाला पुण्यातून अटक

NCP Leader Baba Siddique Murder : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
NCP Leader Baba Siddique Shot Dead
NCP Leader Baba Siddique Shot Dead
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यादरम्यान बाबा सिद्दीकी य़ांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारल्याची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली होती. ही पोस्ट शुभू लोणकर महाराष्ट्र या फेसबुक अकाउंटवरून करण्यात आली होती.

दरम्यान या प्रकरणी शुभम लोणकरचा २८ वर्षीय भाऊ प्रवीण लोणकर याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. शुभम लोणकरसह धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम यांना या कटात सामील करून घेतलेल्या कटकारस्थानांपैकी तो एक आहे. याप्रकरणाचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

NCP Leader Baba Siddique Shot Dead
Baba Siddiqui Accused: याआधी तो जेलमध्ये होता, त्याला कुणी बाहेर काढलं माहित नाही... बाबा सिद्दिकींच्या मारेकऱ्यांचे कुटुंबिय नेमकं काय म्हणाले?

बाबा सिद्दीकी हत्या कटाच्या सूत्रधारांपैकी प्रवीण लोणकर (२८) याला गुन्हे शाखेने रविवारी पुण्यातून अटक केली. सिद्दीकी यांच्या हत्येची बिश्नोई टोळीने जबाबदारी स्वीकारल्याची पोस्ट फेसबुकद्वारे प्रसारित करणाऱ्या शुभम लोणकरचा सख्खा प्रवीण सख्खा भाऊ आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण हा सिद्दीकी यांच्या हत्येसाठीच्या कटातील सूत्रधारांपैकी एक आहे. त्याने भाऊ शुभमसोबत या कटात उत्तर प्रदेशातील धर्मराज काश्यप आणि शिवकुमार गौतम यांनी सहभागी करून घेतले. सिद्दीकी यांची हत्या करणारा शिवकुमार काही महिन्यांपासून पुण्यात एका भंगार विक्रेत्याकडे आश्रित होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच अन्य साथीदार धर्मराज ऊर्फ रंजन हा उत्तर प्रदेशातून प्रथम पुण्यात आला. त्यानंतर मुंबईत येऊन आरोपींनी त्यांच्यावर पाळत ठेवली.

NCP Leader Baba Siddique Shot Dead
Baba Siddique Murder : जेव्हा सलमानने केलेली बाबा सिद्दीकी यांची आमदार बनण्यात मदत ; मोदींसोबतचा जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेत

जूनपासून तयारी


बिष्णोई टोळीशी संबंधित लोणकर बंधूंनी जूनमध्ये अकोट सोडले. दुसरीकडे गुरमेल सिंग हा हरियाना कारागृहातून जामिनावर बाहेर आला. त्यांनतर हे सर्व पुण्यात एकत्र आल्याची माहिती पुढे येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.