Pune Crime : थकीत कर्जाचे हप्ते मागितल्यावरून बांबूने बेदम मारहाण

पत्नीच्या नावावर बँकेतून काढलेल्या कर्जाचे थकीत हप्ते मागितल्याचा राग आल्याने दोघांनी एका व्यक्तीला बांबूने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले.
Beating
BeatingSakal
Updated on

पुणे - पत्नीच्या नावावर बँकेतून काढलेल्या कर्जाचे थकीत हप्ते मागितल्याचा राग आल्याने दोघांनी एका व्यक्तीला बांबूने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना कोंढवा परिसरात मंगळवारी (ता.३०) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शिवनेरीनगर परिसरात घडली.

याबाबत हसन हनीफ शेख (वय ४०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन बाबू ऊर्फ मेहबूब शेख (वय २८), अमीर मुलाणी (वय ३२, दोघे रा. शिवनेरीनगर, कोंढवा) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबू शेख आणि फिर्यादी हसन शेख एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी हसन यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे बँकेतून कर्ज काढून बाबू शेख याला दिले होते. मात्र, त्याने कर्जाचे हप्ते भरले नाहीत. चार महिन्यांचे हप्ते थकल्याने हसन मित्रासमवेत कर्जाच्या हप्त्यांचे पैसे मागण्यासाठी आरोपी शेखच्या दुकानाजवळ गेले होते.

फिर्यादीने पैसे मागितल्याचा राग आल्याने बाबू शेख याने हसन यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, दुकानात काम करणारा कामगार अमीर मुलाणीने हसन यांच्या डोक्यात बांबूने मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वैभव सोनवणे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.