Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी अग्रवाल पती-पत्नी व डॉक्टरांसह इतरांचा जामीन अर्ज फेटाळला
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपींनी गुन्हा घडल्याच्या पहिल्याच दिवशी कागदपत्रांसह पुराव्यामध्ये छेड़छाड़ करण्याबरोबरच नवीन पुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
पुणे - कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्या प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यातील सर्व आरोपींचे जामीन अर्ज येथील विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी फेटाळले.