Kalyaninagar Accident प्रकरणी रक्ताचे नमुने बदलण्यात सहभाग असलेल्या दोन आरोपींचा जामीन फेटाळला

Kalyaninagar Accident Update:कल्याणीनगर अपघात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. रक्ताचे नमुने बदलण्यात सहभाग असलेल्या दोन आरोपींचा जामीन फेटाळण्यात आला आहे.
Kalyaninagar Accident
Kalyaninagar Accidentsakal
Updated on

पुणे: कल्याणीनगर अपघात प्रकरणात कारचालकाच्या दोन अल्पवयीन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्यात सक्रिय सहभाग असलेल्या दोन आरोपींचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला. ‘रक्ताच्या नमुन्यात अदलाबदल आणि त्याचा खोटा अहवाल तयार करणे म्हणजे बहुमूल्य दस्तावेजांचे बनावटीकरण आहे,’ असे निरीक्षण नोंदवीत विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.

आदित्य अविनाश सूद (वय ५२, रा. सोपान सोसायटी, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) आणि आशिष सतीश मित्तल (वय ३७, रा. स्काय वेल्वेडर सोसायटी, विमाननगर) या आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना येरवडा कारागृहातील न्यायालयीन कोठडीतच मुक्कामी राहावे लागणार आहे. मोटारचालक मुलाच्या दोन अल्पवयीन मित्रांना वाचविण्यासाठी आदित्य सूद व आशिष मित्तलने ससूनच्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर व न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांना लाच दिली.

Kalyaninagar Accident
2024 Pune car crash: पोर्शे कार अपघातानंतर केलेले कारनामे भोवणार; गुन्ह्यांत कलमवाढ! अल्पवयीन आरोपीचा पाय खोलात

त्यानंतर आदित्य सूदने एका मुलाच्या रक्ताच्या नमुन्याच्या जागी स्वतःच्या रक्ताचा नमुना दिला, तर आशिष मित्तलने आरोपी अरुणकुमार सिंग याच्या सांगण्यावरून दुसऱ्या मुलाच्या जागी स्वतःचे रक्त दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी सहभाग उघड झाल्यावर दोघे अटकेच्या भीतीने दोन्ही आरोपी परराज्यात पळून गेले होते. पुणे पोलिसांची पथके आपल्या मागावर असल्याचे कळताच आरोपी पुण्यात परतले आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.

न्यायालयीन कोठडी झाल्यावर दोन्ही आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी विरोध केला. विविध साक्षीदारांचे जबाब आणि सीए अहवालाच्या आधारे दोन्ही आरोपींचा रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रकारात सहभाग असल्याचे ॲड. हिरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपींच्यावतीने ॲड. सतीश शर्मा आणि ॲड. आबिद मुलाणी यांनी युक्तिवाद केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.