खंडणी वसुल करणा-या पोलिस उपनिरीक्षकाला जामीन मंजूर

सात हजार रुपयांची खंडणी घेणा-या पोलिस उपनिरीक्षकाला न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला.
Court
CourtSakal
Updated on

पुणे - मुंढवा भागातील तीन हॉटेल चालकांकडून (Hotel Owner) सात हजार रुपयांची खंडणी (Ransom) घेणा-या पोलिस उपनिरीक्षकाला (Police Inspector) न्यायालयाने (Court) शुक्रवारी जामीन (Bell) मंजूर केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. देशपांडे यांनी हा आदेश दिला.

मिलन शंतनू कुरकुटे (वय ३२, रा. कासारवाडी) असे या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. कुरकुटे हा हिंजवडी पोलिस ठाण्यात नियुक्तीला आहे. मंगळवारी तो रात्री १० वाजण्याच्या सुमारास कुरकुटे आपल्या चारचाकी गाडीतून गणवेशात मुंढव्यातील हॉटेल लोकल गॅसस्ट्रो ॲन्ड बार येथे गेला. ताबडतोब हॉटेल बंद करा. नाही तर मी तुमच्या हॉटेलवर कारवाई करीन, असे हॉटेलचे व्यवस्थापक मारुती गोरे यांना बजावले. कारवाई होवू द्यायची नसेल तर मला दोन हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून जबरदस्तीने दोन हजार रुपये गोरे यांच्याकडून घेतले. त्यानंतर त्याने हॉटेल वन लॉन्जमध्ये जाऊन दोन हजार रुपयांची खंडणी घेतली.

Court
Army Recruitment Case : प्रकरण स्वतःकडे घेण्यास लष्कराची असमर्थता

दोन्ही ठिकाणी खंडणी घेतल्यानंतर कुरकुटे याने एबीसी रस्त्यावरील हॉटेल कॉनिव्हल मधील व्यवस्थापक किशोर थापा यांना कारवाईची धमकी देऊन तीन हजार रुपयांची खंडणी घेतली, असे तक्रारीत नमूद आहे. अटक झाल्यानंतर कुरकुटे याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला. कुरकुटे याने ॲड. अमेय डांगे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. आरोपी पोलिसाकडून गणवेश, कार आणि रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस तपासास सहकार्य करण्यास तयार आहे. तर या प्रकरणी दाखल गुन्ह्यात तीन वर्षांची शिक्षा आहे. त्यामुळे आरोपीस जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद डांगे यांनी केला. पोलिस उपनिरीक्षक एच. एस. गिरी अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.