Job Scam : नोकरी लावण्याच्या आमिषाने ४४ जणांची फसवणूक प्रकरणी शैलजा दराडेंना जामीन मंजूर

विविध अटीशर्तींसह ७५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे.
shailaja darade
shailaja daradesakal
Updated on

पुणे : शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने ४४ जणांची तब्बल ५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी जामीन मंजूर केला आहे.

पुराव्यात छेडछाड करू नये तसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये यासह विविध अटीशर्तींसह ७५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे.

उमेदवारांना शिक्षक, आरटीओ, तलाठी पदावर नोकरी लावू तसेच टीईटी उत्तीर्ण करून देवू असे आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी शैलजा दराडे (रा. पाषाण) यांच्यासह त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. इंदापूर) यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोपट सुखदेव सूर्यवंशी (रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली होती.

त्यानंतर सात ऑगस्टला शैलजा दराडे यांना अटक झाली. दराडे यांना न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती.

shailaja darade
War 2 Release Date: हृतिक अन् एनटीआरच्या 'वॉर 2'साठी करावी लागणार दोन वर्ष प्रतिक्षा! जाणून घ्या चित्रपट कधी होईल प्रदर्शित

प्रकरण काय आहे?

या प्रकरणातील फिर्यादी सूर्यवंशी हे शिक्षक आहेत. त्यांच्या नात्यातील एका महिलेला शिक्षक पदावर नोकरी हवी होती. त्यासाठी ते विविध ठिकाणी माहिती घेत होते. जून २०१९ मध्ये त्यांची दादासाहेब दराडे याच्याशी ओळख झाली. त्याने बहीण शैलजा दराडे शिक्षण विभागात अधिकारी असल्याचे सूर्यवंशी यांना सांगितले.

shailaja darade
Ind vs Aus : काय झाडी काय डोंगर... अन् गुवाहाटीच्या 'त्या' मैदानावर प्रसिद्ध कृष्णाच्या नावावर लज्जास्पद विक्रम

मी तुमच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षक पदावर नोकरी लावतो, असे आमिष त्याने फिर्यादी यांना दाखवले. त्या बदल्यात त्याने सूर्यवंशी यांच्याकडून २७ लाख रुपये घेतले. काही महिने उलटल्यानंतरही नातेवाईक महिलांना नोकरी न लावल्याने सूर्यवंशी यांनी पैसे मागितले. मात्र, त्याने पैसे परत न देता फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सूर्यवंशी यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.

शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी लावण्यासाठी शैलजा दराडे या त्यांच्या भावामार्फत डी.एड. झालेल्यांकडून सुमारे १२ तर बी.एड. झालेल्यांकडून सुमारे १४ लाख रुपये घेत होत्या. या प्रकरणी त्यांना निलंबन करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळून लावला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.