MP राजीव सातव यांना न्युमोनियाचा संसर्ग

खा. राजीव सातव
खा. राजीव सातव
Updated on

पुणे : काँग्रेस खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांनी कोरोनावर मात केल्यानंतर आता न्युमोनियाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासलळी असून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान, राजीव सातव यांच्या प्रकृतीची काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चौकशी केली. याबाबत बोलताना ते म्हणाले, माझे नुकतेच डॉक्टरांशी बोलणे झाले आहे. वर्षा गायकवाड इथंच आहेत. सातव यांची प्रकृती सुधारत होती, पण पुन्हा त्रास सुरू झाला आहे. लवकरच ते बरे होतील '' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Balasabheb Rhorat visit Congress MP Rajiv Satav after Infected with pneumonia)

काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राजीव सातव हे कोरोनाची लागण झाल्याने काही दिवसांपासून आजारी होते. नुकताच त्यांचा कोरोन रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण पुन्हा त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाल्याने प्रकृती पुन्हा खालवली असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर सातव यांच्यावर पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. प्रकृती खालावल्याने 25 एप्रिलला त्यांना ICUमध्ये हलवण्यात आले असून व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेऊन चौकशी केली.

खा. राजीव सातव
कोरोना बाधितांना दिलासा; आणखी सहा ऑक्सिजन प्लांटची निर्मिती!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()