पाठ्यपुस्तकातून कोणत्याही धर्माचा प्रचार करण्याचा उद्देश नाही : बालभारती

बालभारतीच्या इयत्ता चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकात धडा क्रमांक नऊमध्ये ‘ईदगाह’ समाविष्ट करण्यात आलेला आहे.
BALBHARTI
BALBHARTIEsakal
Updated on

पुणे : ‘‘बालभारतीच्या (BalBharti) इयत्ता चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकात (Marathi Book) धडा क्रमांक नऊमध्ये ‘ईदगाह’ समाविष्ट करण्यात आलेला आहे. या धड्यासंदर्भात विविध समाज माध्यमातून चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. परंतु या पाठातून कोणत्याही धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचा उद्देश नाही. त्यामुळे याबाबत कोणताही विपर्यास करण्यात येऊ नये,’’ असे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे (बालभारती) संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिले आहे. (Fourth Standard Marathi Subject Syllabus )

ब्राह्मण महासंघाच्या वतीने इयत्ता चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकात ‘ईदगाह’ नावाचा धडा रद्द करण्यात यावा, अशी मागणी काही दिवसांपूर्वी बालभारतीकडे करण्यात आली होती. या मागणीचे निवेदनही महासंघातर्फे बालभारतीला देण्यात आले होते. ‘‘इयत्ता चौथीच्या पुस्तकात ‘ईदगाह’ हा पाठ समाविष्ट आहे. या धड्यात मुस्लिम धर्मातील ईद बद्दल सविस्तर माहिती दिलेली असून त्यावरील प्रश्नांचा अभ्यासात समावेश केला आहे.

BALBHARTI
इस्लामपूर : प्रशासक वैभव साबळे 'ऍक्शन मोड'मध्ये; शहर सौंदर्यीकरणावर भर

याचा ब्राह्मण महासंघातर्फे निषेध करण्यात येत आहे. हा धडा रद्द करण्यात यावा,’’ असे महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी निवेदनात म्हटले आहे. यावर बालभारतीने खुलासा करत भूमिका मांडली आहे.

‘‘इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील ‘ईदगाह’ धड्यासंदर्भात विविध समाज माध्यमांतून चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. बालभारतीच्या इयत्ता चौथीच्या मराठीचे पाठ्यपुस्तक गेल्या सात वर्षांपासून अभ्यासले जात आहे. परंतु पाठ्यपुस्तकातील ‘ईदगाह’ या धडाच्या अनुषंगाने यापूर्वी कोणताही प्रकारचे आक्षेप बालभारतीकडे प्राप्त झालेले नाहीत. राष्ट्रीय उद्दिष्टे व गाभा घटक यामध्ये ‘सर्वधर्मसमभाव’ हे मूल्य समाविष्ट आहे.

BALBHARTI
पुसेगाव : परप्रांतीय मजुराचा खून; सहकाऱ्यांनीच मारल्याचा संशय

‘ईदगाह’ हा धडा भारतीय साहित्यातील प्रसिद्ध साहित्यिक प्रेमचंद यांच्या ‘मानसरोवर’ या कथा संग्रहातून निवडण्यात आला आहे. या धड्याचा मराठी अनुवाद संजीवनी खेर यांनी केलेला आहे. या धड्यातून कोणत्याही धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचा उद्देश नाही. त्यामुळे याबाबत कोणताही विपर्यास करण्यात येऊ नये’’, असा खुलासा पाटील यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.