आता घरबसल्या मिळणार पहिली ते बारावीची पाठ्यपुस्तके; 'बालभारती'कडे करा 'ऑनलाईन ऑर्डर'!

Balbharati_Pune
Balbharati_Pune
Updated on

पुणे : उन्हाळ्याची सुटी संपत असताना वेध लागतात ते नव्या कोऱ्या पाठ्यपुस्तकांच्या खरेदी-विक्रीचे. आता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) भांडारातील पाठ्यपुस्तकांच्या विक्रीबरोबरच यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन पाठ्यपुस्तक विक्रीला प्राधान्य दिले आहे.

गेल्या तीन दिवसांत बालभारतीच्या संकेतस्थळावरील ऑनलाईनद्वारे तब्बल 2 कोटी 84 लाख रूपयांची पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविली गेली आहे.

बालभारतीने शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये राज्यातील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातून आणि खुल्या बाजारामधील पुस्तक विक्रेत्यांमार्फत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया नुकतीच सुरू केली आहे. यंदा अभियानामार्फत 5 कोटी 73 लाख 30 हजार 269 पाठ्यपुस्तके आणि बाजारातील विक्री अंतर्गत 3 कोटी 87 लाख 5 हजार पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत.

पाठ्यपुस्तके खरेदीसाठी गर्दी होऊ नये, म्हणून टप्प्याटप्याने पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत. काही दिवसांपूर्वी दहावीच्या पाठ्यपुस्तकांची विक्री सुरू केली होती. आता इयत्ता पहिली ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांची विक्री सुरू केली आहे. त्यानंतर नववी ते अकरावीच्या पाठ्यपुस्तकांची विक्रीस उपलब्ध होणार आहेत.

अशी घेतली जाते ऑनलाईन 'ऑर्डर'
''पाठ्यपुस्तके खरेदी-विक्रीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन विक्रीचा पर्याय सोईस्कर ठरत आहे. याद्वारे चोवीस तास पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविता येत आहे. ऑनलाईनच्या सहाय्याने पाठ्यपुस्तकांची मागणी करून पैसे भरल्यानंतर संबंधित भांडारांच्या व्यवस्थापकांना संदेश जातो. त्यानंतर पाठ्यपुस्तके कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत मिळतील, याचा संदेश संबंधित ग्राहकाला व्यवस्थापकांमार्फत दिला जातो.

त्याप्रमाणे ग्राहक भांडारात जाऊन मागणी केलेली पाठ्यपुस्तके घेत आहेत. गेल्या तीन दिवसात 'बालभारती'कडे 89 विक्रेते, शैक्षणिक संस्थांनी मिळून तब्बल 2 कोटी 84 लाख रूपयांच्या पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविली आहे, अशी माहिती 'बालभारती'चे संचालक विवेक गोसावी यांनी दिली.

बालभारतीच्या संकेतस्थळावरून पीडीएफ स्वरूपात आतापर्यंत डाऊनलोड झालेल्या फाईलची संख्या :
इयत्ता : पाठ्यपुस्तकांच्या पीडीएफ डाऊनलोडची संख्या
पहिली ते नववी आणि अकरावी : 61,20,755
दहावी : 10,50,891
बारावी : 20,54,195

पाठ्यपुस्तकांच्या वितरणातील अडचणी :
- पाठ्यपुस्तक भांडारातून पाठ्यपुस्तके नेण्यासाठी वाहने न मिळणे.
- पाठ्यपुस्तकांचे ओझे उचलण्यासाठी मजुरांची कमतरता
- पाठ्यपुस्तकांच्या वाहतुकीला गाड्या मिळण्यात अडचणी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.