Balewadi News : बालेवाडीतील अष्टविनायक चौकातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात

गेल्या महिन्या भरापासून सर्वत्र सतत पाऊस पडत आहे. सततच्या पावसाने नागरिकांची चांगलीच धांदल उडवली आहे.
Garbage in Balewadi
Garbage in Balewadisakal
Updated on

बालेवाडी - येथील अष्टविनायक चौक ते वाटीका सोसायटी पर्यंत मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे हाल होत असुन, आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाचे वाहणारे पाणी पावसाळी वाहीनीत न जाता ते मोठया प्रमाणात रस्त्यावरच तुंबते. त्याच बरोबर या चौकात रस्त्याच्या बाजूलाच कचरा टाकला जातो त्यामुळे पाणी वाहायला अडसर निर्माण होऊन, पाणी तिथेच साठून राहते.

या पाण्यामुळे व कचऱ्यामुळे या भागातील अनेक नागरिकाना डेंग्यू, मलेरिया सारखे साथीचे आजार होत आहेत. तरी प्रशासनाने यावर कायम स्वरूपात उपाय योजना करण्याची मागणी याभागातील बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन कडून करण्यात आली आहे.

गेल्या महिन्या भरापासून सर्वत्र सतत पाऊस पडत आहे. सततच्या पावसाने नागरिकांची चांगलीच धांदल उडवली आहे. सध्या बालेवाडी येथील अष्टविनायक चौक ते वाटीका सोसायटी पर्यंत मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याभागातील ओरवी सोसायटीच्या बाजूने एक रस्ता पाटील वस्ती कडे जातो. या रस्त्याचे काम महापालिकेकडून करण्यात आले आहे.

या ठिकाणी रस्त्यावरून वाहणारे पाणी पावसाळी वाहीनीत न जाता रस्त्यावर साठून राहते, तसेच पावसाळी वाहिनीचे काम अर्धवट असल्याने दरवर्षी ओरवी सोसायटीच्या तळमजल्या मध्ये सतत पाणी जमा होते , त्यामुळे सोसायटीत डेंग्यू , मलेरिया सारखे आजार बळावत आहेत. सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे ओरवी सोसायटीच्या भिंतीला तडे जाऊन,धोका निर्माण झाला आहे.

यातच इथे रस्त्यावर पुढे महाविरतरनचे मोठे फिडर पिलर आहे ,त्याभोवती पाणी साठल्याने एखादी दुर्घटना घडू शकते. या सोसायटीच्या सीमा भिंती जवळचं नागरीक मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात त्यामुळे पाणी पुढे वाहून जाण्यास अडचण येते आहे.हा कचरा कुजून सगळी कडे दुर्गंधी पसरली आहे. याच बरोबर वाटीका व प्रायमा डोमस या सोसायट्यांतील रहिवाशांना या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो.

मोठा पाऊस पडला की या रस्त्यावरून गुडघाभर पाण्यातून नागरीकांना ये जा करावी लागते.यासंबंधी येथील रहिवासी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करतात पण याकडे दुर्लक्ष केले जाते असे या नागरीकांचे म्हणणे आहे. याबाबतीत बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन सदस्यांकडून या भागांची पहाणी करून कायम स्वरूपात उपाय योजना करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी फेडरेशनचे मोरेश्वर बालवडकर, रमेश रोकडे, आशिष कोटमकर, इंद्रजित कुलकर्णी, दफेदार सिंह, अजित धात्रक , प्रदिम पाटणकर व तीन्ही सोसायटीचे कमेटी मेंबर्स उपस्थित होते.

येथील रस्ते चुकिच्या पद्धतीने बांधले गेले असल्याने आमच्या सोसायटीच्या बेसमेंट मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठते. यामुळे सोसायटीच्या सीमा भिंतीला लहान तडे जाऊन पाणी सोसायटी शिरते आहे. पाण्यामुळे भिंतीस धोका निर्माण झाला आहे.

- कपील रूचंदानी, ओरवी सोसायटी

वाटीका सोसायटी जवळ मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. येथे आठवडी बाजार भरतो, या बाजारातील कचरा ही येथे टाकला जातो. कचरा कुजून सगळी कडे दुर्गंधी पसरली असुन डास, माशा वाढून त्यामुळे अरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

- प्रतीन पाटणकर - प्रयमा डोमस सोसायटी

या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहाणी करून पाणी वाहण्यास नेमकी काय समस्या आहे हे पाहून त्वरित उपाययोजना केल्या जातील.

- मकरंद वाडेकर, उपअभियंता, पथ विभाग

एक दोन दिवसात पावसाळी वाहिनी साफ करून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. तसेच इतर काही अडचण असेल तर ती पण सोडविण्यात येईल.

- गिरीश दापकेकर, औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय सहाय्यक आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.