Pune News : शनिवारवाड्याच्या परिसरातील बांधकामावरील बंदी उठवा - रवींद्र धंगेकर

पुरातत्त्व खात्याच्या जाचक अटींमुळे पुण्यात शनिवारवाडा, पाताळेश्वर मंदिर यासह इतर ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरातील जुन्या वाड्यांचा पुनर्विकास रखडला आहे.
MLA Ravindra Dhangekar
MLA Ravindra Dhangekarsakal
Updated on

पुणे - पुरातत्त्व खात्याच्या जाचक अटींमुळे पुण्यात शनिवारवाडा, पाताळेश्वर मंदिर यासह इतर ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरातील जुन्या वाड्यांचा पुनर्विकास रखडला आहे. या भागातील नागरिक मेटाकुटीला आले आहेत,त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हे नियम शिथिल करावेत अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत पुरवणी मागण्यांच्या चर्चेत सहभागी होत धंगेकर यांनी वाड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित केला. शहरात शंभर वर्षांपेक्षा जास्त जुने असलेले अनेक वाडे आहेत. १९९२ मध्ये शनिवारवाडा, पाताळेश्वर, आगाखान पॅलेस येथील 100 मिटर परिसरातील बांधकामावर निर्बंध लादले आहेत. त्याचा फटका पेठांमधील वाड्यांच्या पुनर्विकासाला बसला आहे.

शनिवारवाडा परिसरातील जुन्या वाड्यात राहणाऱ्या नागरिकांचा जीव मेटाकुतीला आला आहे. राज्य सरकारने त्वरित केंद्र सरकारशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी धंगेकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.