'माझं चुकलं असेल तर...' बंडातात्यांनी मागितली माफी

bandatatya karadkar
bandatatya karadkarSakal
Updated on
Summary

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांची मुले दारु पितात असं वक्तव्य बंडातात्या यांनी साताऱ्यात केलं होतं.

पुणे - दारुबाबत केलेल्या वक्तव्यावर कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यानं भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असं म्हणत त्यांनी वादावर पडता टाकण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule), भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासह अनेक नेत्यांची मुले दारु पितात असं वक्तव्य बंडातात्या यांनी साताऱ्यात केलं होतं. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. त्यानंतर अखेर सांयकाळी इंदापूर तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफीनामा सादर केला.

बंडातात्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातून टीका केली जात होती. अखेर त्यांनी या प्रकरणी नरमाईची भूमिका घेत माफी मागून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. बंडातात्या म्हणाले की, 'मी ज्यांच्याबद्दल बोललो त्यांच्याशी फोनवरून संपर्क केला आहे. त्यामुळे माझे वक्तव्य जर चुकले असेल तर मी माफी मागतो. माफी मागण्यात कसला कमीपणा? माझ्या वक्तव्याचं पत्रकारांनी भांडवलं केलं, आता विषय वाढवू नये.'

bandatatya karadkar
'सुप्रिया सुळे-पंकजा मुंडे दारु पितात'; बंडातात्यांच्या वक्तव्यावर आव्हाड म्हणतात...

दरम्यान, बंडातात्यांच्या वक्तव्याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. सातारा पोलिसांनी बंडातात्यांवर कडक कारवाई करावी आणि याचा अहवाल ४८ तासांच्या आत सादर करावा. बंडातात्यांनी त्यांचा लेखी खुलासा ७ दिवसांच्या आत आयोगाकडे सादर करावा अशा सूचना आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या होत्या. आता कराडकरांनी माफीनामा सादर केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणार का हे पहावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.