कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात पुण्यात खटला दाखल

महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खासगी फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.
bandatatya karadkar and rupali thombare
bandatatya karadkar and rupali thombareSakal
Updated on
Summary

महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खासगी फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.

पुणे - सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री (Wine Selling) करण्याच्या राज्यसरकारच्या निर्णयाविरोधात महिला (Women) नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांच्या विरोधात येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खासगी फौजदारी खटला (Case Filed) दाखल करण्यात आला आहे. बदनामी केल्याप्रकरणी कराडकर यांच्यावर कारवाई (Crime) करण्यात यावी, अशी मागणी खटल्याद्वारे करण्यात आली आहे.

माजी नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या ॲड. रूपाली ठोंबरे-पाटील यांनी ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. हितेश सोनार आणि ॲड. दिग्विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत हा खटला दाखल केला आहे. कराडकर यांनी जाणीवपूर्वक कोणताही पुरावा नसताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

bandatatya karadkar and rupali thombare
आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांना मिळणार आकाश निरीक्षणाचे धडे

सातारा येथे वाइन विक्री निर्णयाविरोधात आंदोलन करताना कराडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. तसेच खासदार सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांची मुले दारू पितात. तसेच ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला, अशी मराठीत म्हण आहे. उद्धव ठाकरे यांना अजित पवारांचा गुण लागल्याने सरकारने दारू विक्रीचा निर्णय घेतल्याची टीका त्यांनी केली होती, असे याबाबत दाखल असलेल्या खटल्यात नमूद आहे. या वक्तव्याची खल घेऊन कराडकर यांच्यावर बदनामी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी. खटला न्यायालयाने दाखल करून घेतला असून त्यावर लवकरच सुनावणी होईल, अशी माहिती ॲड. ठोंबरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.