'एटीएम सिस्टीम' हॅक करुन बँकेची फसवणूक; पुण्यातून दोन नायझेरीयन तरुणांना बेड्या

एटीएम मशीनमध्ये अतिरिक्त यंत्रणा बसवून त्याद्वारे एटीएम मशीन हॅक करून बॅंकेची फसवणूक करणाऱ्या दोन नायझेरीयन तरुणांना सायबर पोलिसांच्या पथकाने केली अटक
Crime
CrimeSakal
Updated on

पुणे - एटीएम मशीनमध्ये (ATM Machine) अतिरिक्त यंत्रणा बसवून त्याद्वारे एटीएम मशीन हॅक (Hack) करून बॅंकेची फसवणूक (Bank Cheating) करणाऱ्या दोन नायझेरीयन तरुणांना (Nigerian Youths) सायबर पोलिसांच्या (Cyber Police) पथकाने अटक (Arrested) केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 7 मोबाईल, 3 लॅपटॉप, दुचाकी असा ऐवज जप्त केला. (Bank Fraud Hacking ATM System Two Nigerian Youths Arrested)

डेव्हीड चार्लस (वय 30), केहिंडे सादिक इदरिस (वय 29, रा. उंड्री ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या वेगवेगळ्या भागात काही व्यक्तींकडून बॅंकांच्या एटीएम मशीनमध्ये अतिरीक्त यंत्रणा बसवून एटीएमची व्यवस्था हॅक करण्याचा प्रकार घडत होता. याबाबत काही टोळ्या सक्रीय झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. एटीएमची व्यवस्था हॅक केल्यानंतर एटीएममधील पैसे ठेवण्यात येणाऱ्या यंत्रावरील संपुर्ण पैसे काढून घेतले जात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास केला.

Crime
कोल्हापूरचा जवाहर शेतकरी साखर कारखाना अव्वल

त्यानंतर आरोपी वापरत असलेल्या दुचाकीची माहिती पोलिसांनी काढली. त्याद्वारे कोंढव्यातील एका इमारतीत छापा टाकून पहिल्यांदा डेव्हीडला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीमध्ये त्याचा साथीदार केहिंडे असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, पोलिस निरीक्षक कुमार घाडगे, पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गवारी, नितेश शेलार, अनिल पुंडलिक, नवनाथ जाधव, राजकुमार जाबा, शाहरूख शेख, नीलेश लांडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.