बारामती : कोविडच्या रुग्णसंख्येने बारामतीत आज शतक पार केले. अवघ्या 24 तासात बारामतीत तब्बल 117 कोविड पॉझिटीव्ह रुग्ण (Corona Positive) सापडल्यानंतर आता प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसात सातत्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने काळजीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. कुटुंबातील व संपर्क आलेले अनेक जण पॉझिटीव्ह आढळत असल्याने सर्वांनीच कमालीची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने (Health Department)केले आहे.
कालपर्यंत रुग्णसंख्येचा आकडा शंभरच्या आत होता. आज मात्र थेट शंभरी पार करुन हा आकडा 117 पर्यंत गेला. लक्षणे फारशी नसली आणि रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडत नसली तरी सर्वांनी काळजी घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे. प्रशासनाने निर्बंध उठविलेले असल्याने लोक मुक्तपणे वावरत असल्याने फैलाव अधिक वेगाने होत आहे. कोविडग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांनाही लागण होत असल्याने रुग्णसंख्याही वेगाने वाढत आहे. दुसरीकडे प्रशासनानेही रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्याची गरज पडल्यास तशी तयारी ठेवली आहे. रुई रुग्णालयामागील मोड्युलर हॉस्पिटल तसेच मेडीकल कॉलेजमध्येही विलगीकरण कक्षाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सध्या बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात 22 तर रुई मोड्युलर रुग्णालयात 41 व रुई ग्रामीण रुग्णालयात 14 रुग्ण दाखल आहेत. बारामतीत सात दिवसात तब्बल 511 जणांना कोविड झाला आहे. मात्र लक्षणे नसल्याने दवाखान्यात दाखल होण्यापेक्षाही लोक गृहविलगीकरणातच राहत आहेत. ऑक्सिजनचीही गरज नगण्य आहे. रुई मोड्युलर, रुई ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती संचही तयार असून गरज भासल्यास ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकतो असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगितले गेले.
गर्दी टाळावी
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यासह मास्कचा वापर अनिवार्यपणे करावा, सॅनिटायझर वापरावे व सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Pune corona update)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.