Baramati : दापोडी वीज अपघातातील मृतांच्या कुटूंबीयांना महावितरणकडून प्रत्येकी 4 लाखांची मदत

Pune: मयतांना प्रत्येकी चार लाख प्रमाणे मदत दिली जाणार असल्याचे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.
दापोडी वीज अपघातातील मृतांच्या कुटूंबीयांना महावितरणकडून प्रत्येकी 4 लाखांची मदत
Baramatisakal
Updated on

Daund: दापोडी (ता. दौंड, जि. पुणे) येथे सोमवारी ( ता. 17 ) वीजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली . या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी व्यक्तींच्या वारसांना महावितरणमार्फत प्रत्येकी 4 लाखांची मदत दिली जाणार आहे.

मुळ सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले भालेकर कुटुंब दापोडी (ता. दौंड) येथील सूर्यकांत महादेव अडसूळ यांचे घरी भाड्याने राहत होते. अडसूळ यांचे घराचे पाठीमागे मोकळ्या जागेत अंदाजे सहा फूट उंचीचे वीट बांधकाम व त्यावर साडेतीन फूट उंचीचे लोखंडी पत्र्याचे कंपाऊंड केलेले आहे. शेजारी असलेल्या चव्हाण यांचे घराला ज्या सर्व्हिस वायरने वीजपुरवठा होतो.

दापोडी वीज अपघातातील मृतांच्या कुटूंबीयांना महावितरणकडून प्रत्येकी 4 लाखांची मदत
Baramati News : बारामतीजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई! 12 लाख 61 हजारांचे मद्य जप्त

ती सर्व्हिस वायर अडसूळ यांचे घरावरुन अधांतरी गेली आहे. त्याच खांबावरील एका पडेर नामक ग्राहकाची सर्व्हीस वायर खराब झाली असल्याचे आढळले. या सर्व्हिस वायरमधून सर्वच GI वायर मध्ये वीजप्रवाह उतरला.

त्यापैकी चव्हाण यांची GI वायर अडसूळ यांचे पत्र्याच्या ॲगलच्या संपर्कात आल्याने वीजप्रवाह अडसूळ यांचे पत्र्याच्या अँगलला उतरला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दापोडी वीज अपघातातील मृतांच्या कुटूंबीयांना महावितरणकडून प्रत्येकी 4 लाखांची मदत
Baramati : मराठा सेवा संघाने जमविले 500 विवाह, सामाजिक बांधिलकीतून निरपेक्ष भावनेतून उपक्रम

दरम्यान सोमवारी सकाळी सूर्यकांत अडसूळ यांचेकडे भाड्याने राहणारे सुरेंद्र देविदास भालेकर (वय 45) अंघोळीसाठी गेले असता पत्र्याच्या अँगलला बांधलेल्या तारेवर टॉवेल टाकत असताना त्यांना विद्युतभारीत झालेल्या तारेचा त्यांना धक्का लागला. त्यांना वाचविण्यासाठी आलेल्या मुलगा प्रसाद (वय 17) आणि पत्नी आदिका (वय 40) यांनाही विजेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराचा वीजप्रवाह बंद करुन विद्युत निरीक्षक कार्यालयास पंचनाम्यासाठी बोलावले. पंचनामा व शवविच्छेदन अहवाल लवकरच प्राप्त् होईल. तत्पूर्वी महावितरणकडून वीज अपघातामधील मयतांना प्रत्येकी चार लाख प्रमाणे मदत दिली जाणार असल्याचे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.

दापोडी वीज अपघातातील मृतांच्या कुटूंबीयांना महावितरणकडून प्रत्येकी 4 लाखांची मदत
Baramati Election Result: पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यानंतर अजितदादा काय म्हणाले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.