Accident : उपमुख्यमंत्र्यांची वेळेची तत्परता; अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी शासकिय यंत्रणा हलवली

या अपघाताच्या प्रसंगात पवार यांनी दाखविलेली तत्परता बारामतीकरांच्या दृष्टीने महत्वाची ठरल्याचे सांगण्यात आले.
dattatrey teke
dattatrey tekesakal
Updated on

माळेगाव - आज शनिवारी पहाटे दोनची वेळ...उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईमधील दिवगिरी बंगल्यातील फोन खणखणला...बारामतीच्या कार्य़कर्त्याकडून बंगल्यामधील फोन आॅपरेटरला पोलादपूर घाटातील भयंकर अपघाताची माहिती कळविण्यात आली..अजित पवार माहिती मिळताच झोपेतून ताडकण उठतात आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी शासकिय यंत्रणा हलवितात.

मध्यरात्रीची वेळ असतानाही पोलादपुर घटनास्थळी आदेशानुसार पोलिस, आरोग्य विभागाचे अधिकारी व इतर कर्मचारी पोचतात, परंतु ती तातडीची मदत मिळेपर्यंत माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथील दत्तात्रेय शरद टेके हा युवक मयत झाला होता, तर सुदैवाने बारामतीचे सात युवक या अपघातात बचाविल्याची माहिती पुढे आली. या अपघाताच्या प्रसंगात पवार यांनी दाखविलेली तत्परता बारामतीकरांच्या दृष्टीने महत्वाची ठरल्याचे सांगण्यात आले. 

बारामती येथील कोष्टी गल्लीमधील आठ युवक दोन फोरव्हिलर गाड्यांद्वारे गोव्याला जात होते. आज शनिवार (ता. ८)  रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास पोलादपूर घाटामध्ये (जि. रायगड) पाठीमागून भरधाव येणाऱ्या टॅंकरने बारामतीच्या या दोन्ही गाड्यांना जोरदार ठोकर देत चिरडले. या भीषण अपघातामध्ये किरकोळ दुखापती वगळता बारामतीचे सातजण बचावले, परंतु त्या अपघातग्रस्त गाड्यांमधून माळेगावच्या दत्तात्रय टेके (वय ४३) याला बाहेर पडता आले नाही. दुर्वैवाने त्या अपघातामध्ये त्याची प्राण ज्योत मावळली. ही घटना ऐवढी भयंकर होती, की बचावलेल्या युवकांना रात्रीच्यावेळी काय करावे ते सूचत नव्हते. जखमींपैकी एकाने माळेगावचे कार्य़कर्ते रविराज तावरे यांना मोबाईलद्वारे संपर्क केला व  झालेल्या दुर्घटनेची माहिती देत मदतीची मागणी केली.

dattatrey teke
Balasore Train Accident: बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी मोठी कारवाई, सीबीआयने 3 जणांना केली अटक

पोलादपूरच्या घाटात रात्रीच्यावेळी मदत पोचविणे आव्हानात्मक होते, परंतु तावरे यांनीही रात्री दोन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगाल्यावर अपघाताची माहिती कळविली. त्यानुसार पवार यांनीही झोपेतून उठत तातडीने बारामतीच्या अपघातग्रस्तांना मदत पोचविण्यासाठी शासनस्तरावर प्रय़त्न केले. पोलिस, आरोग्य विभाग आणि महसूल विभागाची मदत जखमींना वेळीच मिळण्यासाठी पवार यांनी रायगड जिल्ह्याचे कलेक्टर, पोलिस अधिक्षक आणि आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.

dattatrey teke
Patients Help Rules : रुग्णांच्या आर्थिक मदतीसाठी तयार होणार नियमावली

आदेशानुसार संबंधित यंत्रणाही घटनास्थळी पोचली, परंतु  ती तातडीची मदत मिळेपर्यंत माळेगावचा दत्तात्रेय टेके हा युवक मयत झाला होता, तर सात जण बचावल्याची माहिती पहाटेपासून संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या पवार यांना देण्यात आली. किरकोळ जखमी झालेल्या व बचावलेल्या सात युवकांना पुढील वैद्यकिय उपचार देण्याकामी पवार यांनी पुन्हा संबधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच त्यांनी मयत युवकाच्या डेडबाॅडीचे शवविच्छेदन वेळेत करून देण्याबाबत सांगितले. दरम्यान, पोलादपूर येथील दुर्वैवी घटनेमुळे शनिवारी माळेगावात शोककळा पसरली होती.

dattatrey teke
Pune Accident : मंचरजवळ झालेल्या एसटी अपघातातील जखमींच्या बिलावरून खडाजंगी

दादा म्हणजे आमचे आश्रेयस्थान...

पोलादपूरमध्ये अपघातात मरण पावलेल्या दत्तात्रेय टेके यांच्या मागे आई,वडील आणि भाऊ व बहिण असा परिवार आहे. अचानकपणे घडलेल्या घटनेने माळेगावातील टेके कुटुंबिय मानसिकदृष्ट्या खूपच खचले आहे. परंतु उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलेली मदत आणि दिलेल्या आधार आमच्यासाठी मोठा आहे. दादा म्हणजे आमचे आश्रेयस्थान आहेत, अशा शब्दात टेके कुटुंबियांनी पवार यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.