बारामती - बारामती विभागाचे नूतन अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून गणेश बिरादार यांनी नुकतीच सूत्रे हाती घेतली.
कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासोबतच या विभागातील विविध प्रश्नांचा अभ्यास करुन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
गणेश बिरादार यांनी या पूर्वी दौंड येथे एसआरपीएफ मध्ये समादेशक म्हणून काम केले आहे. नागपूर व पिंपरी चिंचवड येथे पोलिस उपायुक्त म्हणून ते कार्यरत होते. त्या अगोदर गडचिरोली, सिल्लोड व इचलकरंजी येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्या अगोदर प्राथमिक शिक्षक व तलाठी म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलेले आहे.