काटेवाडी - बारामतीकर आम्हाला विसरणार नाहीत. ते नक्कीच पवार साहेबांना साथ देतील. व आम्हाला देखील आशीर्वाद देतील. राजकीय कुटुंबात असल्यामुळे आरोप प्रत्यारोप मला नवीन नाहीत. निवडणुका म्हटलं की हे होत असते, अशा शब्दात बारामती विधानसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी आपली भूमिका मांडली.