बारामती - विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता उत्सुकता आहे ती निकालाची. बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी प्रमुख लढत होत असून, बारामतीकर कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात, याचे औत्सुक्य आहे. .लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात मैदानात उतरविले, त्याच वेळेस विधानसभेला ज्येष्ठ नेते शरद पवार हेही अजित पवार यांना सहजासहजी विधानसभेची निवडणूक जिंकू देणार नाही, अशी चर्चा होती. त्यानुसारच शरद पवार यांनी थेट अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवारांनाच रिंगणात उतरविले व त्यांच्या पाठीशी ताकद उभी केली..अजित पवार यांचे गेल्या ३५ वर्षांतील बारामतीचे काम व त्यांनी आणलेला निधी, केलेला विकास विचारात घेता अजित पवार यांना बारामतीत पराभूत करणे अवघड असल्याचा अंदाज सगळ्यांनाच होता. मात्र, त्यांना बारामतीत अडकवून ठेवण्याची राजकीय खेळी शरद पवार यांनी केली. प्रचाराच्या पहिल्याच सभेत भावनाविवश झालेले अजित पवार व त्यानंतर त्यांची शरद पवारांनी केलेली नक्कल हे मुद्दे राज्यात गाजले..अजित पवार यांनी यंदा जाणीवपूर्वक शरद पवारांवर टोकाची टीका केली नाही, लोकसभेला एकाकी असलेल्या अजित पवारांच्या मदतीला यंदा त्यांच्या भगिनी विजया पाटील, नीता पाटील व रजनी इंदुलकर धावून आल्या. त्यांनी प्रत्यक्षात प्रचारात सहभाग घेतला. युगेंद्र यांच्या प्रचाराची धुरा शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह श्रीनिवास पवार व शर्मिला पवार यांनी सांभाळली..सांगता सभेला शरद पवार काय संदेश देणार या कडे बारामतीकरांचे लक्ष होते, पण शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर टोकाची टीका व एखादा संदेश देणे टाळले, त्याच वेळेस अजित पवार यांची निवडणूक सोपी झाल्याची बारामतीत चर्चा होती. बारामतीत अजित पवार यांचे पारडे जड असून त्यांचे मताधिक्य किती असेल याकडे आता सर्वांचेच लक्ष आहे..सत्तेत सहभाग महत्त्वाचाअजित पवार बारामतीतून फक्त निवडून जाणे बारामतीकरांसाठी महत्त्वाचे नसून, त्यांनी सत्तेत सहभागी होणे गरजेचे असल्याने निकालादरम्यान नेमके काय घडते याकडे सर्वांचे लक्ष असेल. अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या अजित पवार यांच्यामुळे बारामतीला मोठा निधी मिळाला आहे, त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होणे गरजेचे असल्याचे लोकांचे मत आहे.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.