बारामती - विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणूकीत बारामतीत 71. 27 टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे यांनी दिली..बुधवारी (ता. 20) झालेल्या मतदानामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातील 1 लाख 42 हजार 932 पुरुष, 1 लाख 29 हजार 459 महिला व इतर अकरा अशा एकूण 2 लाख 72 हजार 402 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 2019 च्या तुलनेत बारामतीत जवळपास तीन टक्क्यांहून अधिकच्या मतदानाची नोंद झाली..यंदा राष्ट्रवादीकडून अजित पवार व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार असा पवार कुटुंबातच सामना होता, त्या मुळे मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा होती. दुपारी तीन नंतर मतदानाने वेग घेतला. सत्तरी पार करुन मतदानाच्या आकडयाने यंदा उमेदवारांनाही दिलासा दिला आहे. आता मतमोजणीमध्ये मताधिक्य किती मिळणार व कोणत्या उमेदवारांना किती मते मिळणार याचीच चर्चा सुरु झाली आहे..बारामती विधानसभा मतदारसंघात मेडद येथील बूथ क्रमांक 194 येथे सर्वाधिक म्हणजे 1097 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर सर्वात कमी म्हणजे 209 मतदारांनी नेपतवळण येथील बूथ क्रमांक 89 येथे मतदानाचा हक्क बजावला. बारामतीतील 14 बूथवर सरासरी एक हजारापेक्षा जास्त मतदारांनी मतदान केले.मतदानाचा टक्का वाढल्याने यंदा कोणाच्या मतांच्या संख्येत वाढ होते व कोणाचे मताधिक्य कमी जास्त होते या बाबत बारामतीत आता चर्चा सुरु आहेत. बारामतीसह राज्यात सत्ता कोणाची येईल याचीही जोरदार चर्चा ठिकठिकाणी रंगताना दिसत आहे..अर्थकारणावर थेट परिणाम होणार...अजित पवार विजयी होऊन सत्तेत सहभागी झाले तर बारामतीचे अर्थकारण अधिक वेगाने गती घेईल, पण सत्ता मिळाली नाही व विरोधी पक्षात बसण्याची वेळ अजित पवार यांच्यावर आली तर बारामतीच्या अर्थकारणावर व बाजारपेठेवरही त्याचा विपरीत परिणाम होईल, अशी बारामतीत चर्चा आहे.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.