Crime News : बालविवाह प्रकरणी अकरा जणांविरोधात बारामतीत गुन्हा

अल्पवयीन मुलीचा विवाह केल्या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी तब्बल 11जणावर गुन्हा दाखल केला आहे.
Crime
Crimeesakal
Updated on
Summary

अल्पवयीन मुलीचा विवाह केल्या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी तब्बल 11जणावर गुन्हा दाखल केला आहे.

बारामती - अल्पवयीन मुलीचा विवाह केल्या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी तब्बल 11जणावर गुन्हा दाखल केला आहे. ऊसतोडणी कामगाराची ही मुलगी असून तिने नुकताच एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर ही बाब पुढे आली आहे.

याप्रकरणी संबंधित मुलीने ससून हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी दाखल असताना शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख व डॉ. वृंदा अग्रवाल यांच्यासमोर जबाब दिला. त्यानुसार तिचा पती, सासरे, चुलत सासरे, चुलत दीर तिचे वडील, आई, आजोबा व आजी यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित मुलीने या संबधी फिर्याद दिली. ती सध्या 15 वर्षे 5 महिने वयाची आहे. तिचे आई-वडील ऊसतोडणीचे काम करतात. आत्याच्या मुलाशी तिचा विवाह लावण्यात आला. तिचा पती हा ऊसतोडणीचेच काम करतो. विवाहानंतर तिला दिवस गेले. त्या स्थितीत ती पतीसोबत अंथुर्णे (ता. इंदापूर) भागात ऊसतोडणीसाठी आली.

1 डिसेंबर रोजी तिला त्रास होवू लागल्याने बारामतीच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथून तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिने एका मुलाला जन्म दिला. तिचे वय कमी असल्याचे लक्षात येताच हॉस्पिटलकडून याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार तिचा जबाब घेत फिर्याद दाखल करून घेत विवाह लावून देण्यास कारणीभूत असलेल्या अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.