बारामती - शहराच्या सौंदर्यात भर घालणारा सिटी सेंटर हा सुशोभिकरणाचा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. नीरा डावा कालव्यावरील पूलाचे काम पूर्णत्वास गेले असून लवकरच इतर कामेही सुरु होणार आहेत. जवळपास चौदा कोटी रुपये खर्चून बारामती शहराच्या मध्यवर्ती भागातील हा चौक नव्याने सुशोभित केला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून नीरा डावा कालव्याचे सुशोभिकरण झालेले असून आता तीन हत्ती चौकात सिटी सेंटर पॉईंट विकसीत करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वास्तुविशारद पी. के. दास यांनी या प्रकल्पाचे रेखांकन व आराखडे तयार केले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाच्या संयुक्त वतीने हे काम केले जात आहे.
काय आहे प्रकल्प....
तीन हत्ती चौक हा बारामतीचा मध्यवर्ती भाग आहे. समोरच नगरपालिका व त्याला लगतच हुतात्मा स्मारक व भिगवण चौक आहे. या ठिकाणी भिगवण रस्त्यावरुन येणारी वाहतूक नटराज नाट्य मंदीराच्या बाजूने कालव्यावरील पूलावरुन भिगवण चौकाकडे जाणार आहे. बाजूने वळण घेणारा रस्ता व मधल्या वर्तुळाकार जागेचे सुशोभिकरण करुन लोकांना तेथे संध्याकाळी चार क्षण निवांतपणे व्यतित करता येणार आहेत. शेजारीच नीरा डावा कालवा वाहणार असून हा परिसर नयनरम्य होणार आहे. या मध्ये नगरपालिका वास्तू, शेजारी वसंतनगरकडे जाणारा रस्ता, भिगवणकडे जाणारा व देवीच्या मंदीराकडे जाणा-या रस्त्याच्या मध्यभागी हे सिटी सेंटर असेल, तेथे विदयुत रोषणाई तसेच सेल्फी पॉईंटही केले जातील, त्या मुळे हा भाग आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.