Baramati Crime : बारामतीत पती-पत्नीचा आर्थिक वादातून खून...

शहरातील जामदार रोडवरील खत्री पवार इस्टेटनजीक पती-पत्नीचा आर्थिक देवाणघेवाणीतून खून झाल्याने बारामतीत खळबळ माजली.
baramati crime update husband wife killed over money dispute
baramati crime update husband wife killed over money disputeSakal
Updated on

बारामती : शहरातील जामदार रोडवरील खत्री पवार इस्टेटनजीक पती-पत्नीचा आर्थिक देवाणघेवाणीतून खून झाल्याने बारामतीत खळबळ माजली. सचिन महालिंग वाघोलीकर (वय 44) व सारिका सचिन वाघोलीकर (वय 38, रा. खत्री पवार एन्क्लेव्ह, जामदार रोड, बारामती) असे या पती-पत्नीचे नाव असून या दोघांचाही शनिवारी (ता. 13) सकाळी साडेअकराच्या सुमारास खून करण्यात आला.

एका युवकाने आर्थिक व्यवहाराच्या वादातून या दोघांवर हल्ला केला, त्यात त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा दोघांचे मृतदेह अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.

ऑनलाईन ट्रेडींग करणा-या युवकाकडून वाघोलीकर यांनी वीस लाख रुपये घेतले होते, ते परत करण्यास टाळाटाळ करत होते, त्या वादातून चिडून जाऊन आरोपीने पती पत्नीवर हल्ला करुन त्यांचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. वाघोलीकर यांचा बांधकाम व्यवसाय होता, त्यांना दोन मुलगे आहेत.

दरम्यान या झटापटीमध्ये आरोपीला देखील मार लागला असून त्याच्यावरही दवाखान्यात उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख व अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनीही घटनास्थळी जात माहिती घेतली.

पोलिसांनी तातडीने चौकशी केल्यामुळे आरोपी पोलिसांच्या हाती लागला. या खूनामागे त्याच्या एकटयाचाच हात असून इतर कोणाचा यात सहभाग नसल्याचे सकृतदर्शनी दिसते असेही पोलिस सूत्रांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड व पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाघोलीकर दांपत्यास दोन मुले व एक मुलगी असून ते तिघेही घटना घडली त्यावेळेस घरात नव्हते अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.