Pancharpur Cycle Wari : पंढरपूर सायकल वारीत बारामतीच्या सायकलस्वारांचा सहभाग

बारामतीकर सायकलस्वारांनी 11 जून रोजी सकाळी पंढरपूर नगर प्रदक्षिणा सायकलवर केली. त्या नंतर रेल्वे ग्राऊंडवर सायकल रिंगण सोहळा विठ्ठलाचे नामस्मरण करीत झाला.
Cyclist
Cyclistsakal
Updated on

बारामती - नुकत्या पंढरपूर सायकल वारीमध्ये बारामतीच्या बारामती सायकल क्लबच्या सदस्यांनी सहभागी होत आषाढी वारीनिमित्त आणि पर्यावरण संतुलन, शारीरिक समृद्धी महत्व अधोरेखीत केले.

यंदाच्या पंढरपूर सायकलवारीमध्ये राज्यभरातील 46 सायकल क्लबच्या 1499 सायकलस्वारांनी सहभाग नोंदविला. महाराष्ट्राची पंढरपूर सायकलवारी आणि संमेलन 2023 चे दुसरे पर्व नुकतेच पार पडले.

बारामतीकर सायकलस्वारांनी 11 जून रोजी सकाळी पंढरपूर नगर प्रदक्षिणा सायकलवर केली. त्या नंतर रेल्वे ग्राऊंडवर सायकल रिंगण सोहळा विठ्ठलाचे नामस्मरण करीत झाला. समारोप सायकल संमेलनाद्वारा झाला. या संमेलनादरम्यान समाजासाठी आदर्श काम केलेल्या मान्यवरांना गौरविण्यात आले. पर्यावरण संतुलन बाबतीत सायकलिंगबाबत प्रचार आणि प्रसार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

Cyclist
Gun Firing : स्वारगेट परिसरात पत्रकारावर गोळीबार

सुनील पाटील प्रमुख पाहुणे तर उमेश परिचारक संमेलनाचे अध्यक्ष होते. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माने आणि बारामती सायकल क्लबचे प्रतिनिधी रमेश पांडकर उपस्थित होते.

यंदाच्या या उपक्रमाचे आयोजन व यजमानपद बारामती सायकल क्लबकडे होते. सायकल क्लबचे प्रमुख अँड. श्रीनिवास वायकर यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे सुरेख संयोजन केले गेले. संमेलनात उपस्थित सर्व 1600 सायकलस्वारांना प्रमाणपत्र देऊन गौरविले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.